शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात विद्यार्थ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:43 IST

शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने जिंतूर तालुक्यातील असोला येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक सोमवारी थेट प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्या दालनात दाखल झाले़ शिक्षक द्या आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी शिक्षणाधिकाºयांकडे केली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने जिंतूर तालुक्यातील असोला येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक सोमवारी थेट प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्या दालनात दाखल झाले़ शिक्षक द्या आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी शिक्षणाधिकाºयांकडे केली़जिंतूर तालुक्यातील असोला येथे जिल्हा परिषदेची पहिली ते आठवीपर्यंत शाळा असून, या शाळेत १७० विद्यार्थी शिक्षण घेतात़ या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची ८ पदे मंजूर आहेत़ प्रत्यक्षात मात्र केवळ एक मुख्याध्यापक व शिक्षकच असे केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ चालू शैक्षणिक सत्रात शाळेला शिक्षक मिळतील, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना होती; परंतु, ती फोल ठरली आहे़ शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी शिक्षण विभागाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत़ मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे़ त्यामुळे २५ जून रोजी सकाळी ११ वाजता विद्यार्थी, पालकांनी असोला येथून थेट जिंतूर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठले़ मात्र या कार्यालयात गटशिक्षणाधिकारी उपस्थित नव्हते़ त्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचा हिरेमाड झाला़ त्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन थेट परभणी येथील जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग गाठला़या विभागातील प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्या दालनात ठाण मांडून शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी केली़ यावेळी मधुकरराव घुगे, संपत दरेकर, हरिभाऊ घुगे, तुकाराम घुगे, समाधान दरेकर, ज्ञानदेव दरेकर, बापूराव घुगे, सखाराम राठोड, बाळासाहेब नेवारे, बबन घुगे, अंकुश घुगे, रावसाहेब दराडे, पंढरी घुगे, शंकर घुगे,बालाजी घुगे, भगवान घुगे व विद्यार्थी सहभागी झाले होते़दरम्यान, शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी या शाळेवर दोन शिक्षकांची तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती केली़ त्यानंतर पालक व विद्यार्थ्यांनी हे ठिय्या आंदोलन मागे घेतले़

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थीeducationशैक्षणिक