शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

परभणी :कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 1:13 AM

एमएस्सी कृषी या पदव्युत्तर पदवीला व्यावसायिक पदवीचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ५ फेब्रुवारीपासून विद्यापीठ परिसरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : एमएस्सी कृषी या पदव्युत्तर पदवीला व्यावसायिक पदवीचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ५ फेब्रुवारीपासून विद्यापीठ परिसरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे़कृषी विद्यापीठांतर्गत एमएस्सी कृषी ही पदव्युत्तर पदवी २०१७ पर्यंत व्यावसायिक पदवी म्हणून गनली जात होती़ मात्र महाराष्ट्र शासनाने २०१९ मध्ये एक अध्यादेश काढून एमएस्सी कृषी पदवीचा व्यावसायिक दर्जा काढून हा अभ्यासक्रम अव्यावसायिक असल्याचा आदेश जारी केला़ त्यामुळे कृषी क्षेत्रात पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ विशेष म्हणजे याच अभ्यासक्रमाच्या बीएस्सी पदवी ही पदवी व्यावसायिक असून, पदव्युत्तर पदवी मात्र व्यावसायिक नसल्याचे आदेश काढण्यात आले आहेत़ या आदेशामुळे एमएस्सी कृषी अभ्यासक्रमाचे शुल्कही ८ हजारांवरून ३५ हजारांपर्यंत वाढले आहे़ याशिवाय व्यवसायाच्या अनुषंगाने अडचणींचाही सामना करावा लागत आहे़ त्यामुळे एमएस्सी कृषी या पदव्युत्तर पदवीला परत व्यावसायिक दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थी वर्षभरापासून राज्य शासनाकडे मागणी करीत आहेत़ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या प्रश्नी निवेदन देण्यात आले होते; परंतु, अद्याप या संदर्भात निर्णय झाला नाही़ त्यामुळे बुधवारी विद्यार्थ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे़ हे आंदोलन विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात नसून शासनाच्या विरोधात असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले़ या आंदोलनाच्या माध्यमातून कृषी पदव्युत्तर पदवीच्या व्यावसायिक दर्जा देण्याच्या मागणीबरोबरच पूर्वलक्ष प्रभावाने सर्व शिष्यवृत्त्यांचा लाभ द्यावा, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता द्यावा इ. मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत़ त्याच प्रमाणे राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना आणि एकीकडे पिकांना योग्य भाव मिळत नसताना राज्य शासनाने मात्र विद्यापीठाच्या शुल्कांमध्ये दुप्पट वाढ केली आहे़ हे शुल्क कमी करावे, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे़ बुधवारी विद्यापीठ परिसरातून विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून प्रशासकीय इमारत परिसरात आंदोलनाला सुरुवात केली़ या आंदोलनात कृषी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत़कुलगुरु विद्यार्थ्यांना भेटले४विद्यार्थ्यांनी दुपारी १२ वाजता आंदोलन सुरू केल्यानंतर कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी सायंकाळी ६ वाजता आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांची भेट घेतली व त्यांना त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगने प्रशासनाकडून लेखी पत्र देण्यात आले़४त्यामध्ये विद्यापीठ स्तरावरील मागण्या मान्य करण्यात येतील आणि राज्यस्तरावरील मागण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल तसेच कृषी पदव्युत्तर पदवीला व्यावसायिक पदवी म्हणून मान्यता देण्याबाबत विद्यापीठाने शासनाला शिफारस केली असल्याचे त्यांनी सांगितले़ त्यानंतरही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होते़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनStudentविद्यार्थीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ