परभणी : नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:44 IST2019-05-13T00:43:47+5:302019-05-13T00:44:14+5:30

परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे रविवारपासून नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला.

Parbhani: Start of Nrusingh Janmotsav celebrations | परभणी : नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ

परभणी : नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
पोखर्णी नृ. : परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे रविवारपासून नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला.
रविवारी पहाटे श्रींची महापूजा झाल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी गाथा भजनाने कार्यक्रमांना सुरुवात झाली. दुपारी ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे पोखर्णी फाटा येथे आगमन झाले. यावेळी तरुणांनी मोटारसायकल रॅलीद्वारे त्यांचे स्वागत केले. ढोल-ताशा, फटाक्यांची आतषबाजी करीत समाधान महाराज शर्मा यांची मिरवणूक काढली. पोखर्णी फाटा ते मंदिर मार्गावर विविध ठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. मुख्य व्यासपीठावर ग्रंथपूजा झाल्यानंतर नृसिंह पुराण कथेला प्रारंभ झाला. नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यात यावर्षी पहिल्यांदाच नृसिंह पुराण कथा होत आहे. या संगीत नृसिंह पुराण कथेत शिवम देवडकर, शिवाजी आर्दड, गोविंद नाईकवाडे, समाधान चोपडे, सिद्धेश्वर मुळे यांची साथसंगत लाभत आहे.
नृसिंह पुराणकथा श्रवण करण्यासाठी ग्रामस्थांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोखर्णी नृसिंह येथील ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

Web Title: Parbhani: Start of Nrusingh Janmotsav celebrations