शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

परभणी : २५ वर्षानंतर धावली एसटी मंडळाची बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 23:42 IST

विद्यार्थी, शेतकरी, कामगार व ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून तालुक्यातील देगाववासियांना त्यांच्या हक्काची बस १८ जूूनपासून मिळाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी २५ वर्षानंतर बसने प्रवास करण्याचा आनंद घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी) : विद्यार्थी, शेतकरी, कामगार व ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून तालुक्यातील देगाववासियांना त्यांच्या हक्काची बस १८ जूूनपासून मिळाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी २५ वर्षानंतर बसने प्रवास करण्याचा आनंद घेतला.देगाव (तेल्याचे) हे गाव पूर्णा शहरापासून ६ ते ७ कि.मी. अंतरावर आहे. या गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी पूर्णा शहरात दररोज ये-जा करतात. त्याचबरोबर २०० च्या आसपास तरूण नांदेड ते देगाव कामासाठी ये-जा करतात. पूर्णा-झिरोफाटा रस्त्यावर आड मार्गावर हे गाव असल्याने या गावातील विद्यार्थी, शेतकरी, कामगारांना ये-जा करण्यासाठी वाहन मिळत नसल्याने मोठी अडचण होत होती.२५ वर्षापूर्वी या गावातून परभणी आगाराची बस धावत होती; परंतु, काही कारणाने ती बस बंद झाली. त्यानंतर देगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन मागील महिन्यात परभणी परिवहन विभागाकडे गावात बससेवा सुरु करण्याची मागणी केली. खा. संजय जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी पाठपुरावा केला. ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन १८ जूनपासून परभणी ते देगाव बससेवेस सुरुवात झाली.ही बस परभणी, सिंगणापूर, ताडकळस, पूर्णा मार्गे देवगाव अशी धावणार आहे. दररोज रात्री देगाव येथे एक बस मुक्कामी राहणार आहे. सकाळी ७ वाजता ती परतीच्या प्रवासाला धावणार आहे. या बससेवेमुळे विद्यार्थी, ग्रामस्थ व व्यावसायिकांची मोठी सोय झाली आहे.बससेवा सुरू झाल्यानंतर बुधवारी सकाळी गावातील विद्यार्थ्यांनी बस प्रवासाचा आनंद घेतला. यावेळी पोलीस पाटील प्रकाश इंगोले, रुस्तूम बनसोडे, गणेश इंगोले, जीवन इंगोले, गणेश वळसे, बाळू इंगोले, बाबाराव गव्हाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, पूर्णा तालुक्यातील देगाव येथे २५ वर्षांपासून बससेवा सुरू नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांंना व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. बससेवेअभावी गावातील अनेक विद्यार्थिनींचे शिक्षणही थांबले होते. त्यामुळे २५ वर्षानंतर बुधवारी पहिल्यांदाच गावात आलेली बस पाहण्यासाठी बच्चे कंपनीसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.सिंगणापूर-ताडकळसला होणार फायदापूर्णा तालुक्यातील देगाव येथे २५ वर्षांनंतर एसटी महामंडळाच्या परभणी आगाराने परभणी-देगाव ही बससेवा सुरू केली. या बससेवेमुळे ताडकळस, सिंगणापूर या दोन महत्त्वाच्या गावातील प्रवाशांनाही या बससेवेचा फायदा होणार आहे. त्यामुळे ताडकळस व सिंगणापूर येथील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. २५ वर्षानंतर सुरू झालेली परभणी-देगाव ही बस एसटी महामंडळाच्या परभणी आगाराने कायमस्वरुपी सुरू ठेवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीFarmerशेतकरीstate transportएसटी