शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

परभणी : गहू, हरभऱ्याचा वाढला पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:34 AM

यावर्षीच्या रबी हंगामात गव्हाची ८७़७० टक्के तर हरभºयाची पेरणी १२७ टक्के झाली असून, नियमित पेरणीच्या तुलनेत दोन्ही पिकांचा पेरा वाढला आहे़ जिल्ह्यात परतीच्या पावसाने उपलब्ध झालेला पाणीसाठा लक्षात घेता रबी हंगामात शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांवर भर दिला आहे़ दोन्ही पिकांसाठी लागणारे पाणी उपलब्ध असल्याने यावर्षीच्या हंगामात शेतकºयांनी गहू, हरभºयाला पसंती दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या रबी हंगामात गव्हाची ८७़७० टक्के तर हरभºयाची पेरणी १२७ टक्के झाली असून, नियमित पेरणीच्या तुलनेत दोन्ही पिकांचा पेरा वाढला आहे़ जिल्ह्यात परतीच्या पावसाने उपलब्ध झालेला पाणीसाठा लक्षात घेता रबी हंगामात शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांवर भर दिला आहे़ दोन्ही पिकांसाठी लागणारे पाणी उपलब्ध असल्याने यावर्षीच्या हंगामात शेतकºयांनी गहू, हरभºयाला पसंती दिली आहे़जिल्ह्यात खरीप आणि रबी हंगामांमध्ये पीक उत्पादन घेतले जाते़ खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन हे नगदी पीक म्हणून ओळखले जातात़ तर रबी हंगामामध्ये गव्हाच्या माध्यमातून शेतकºयांना मोठे उत्पादन मिळते़ मात्र आतापर्यंत जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न शेतकºयांना सतावत असल्याने गव्हाचे उत्पादन जेमतेम घेतले जात होते़ यावर्षी परिस्थिती बदलली असून, परतीच्या पावसामुळे गावा-गावांत शाश्वत पाणीसाठे उपलब्ध झाले आहेत़ शिवाय येलदरी, जायकवाडी आणि निम्न दूधना प्रकल्पातून सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता झाल्याने शेतकºयांनी बागायती पिकांवर भर दिला आहे़ कृषी विभागाने यावर्षीच्या रबी हंगामासाठी ३० हजार ४०० हेक्टर क्षेत्र गव्हाच्या पेरणीसाठी प्रस्तावित केले होते़ आतापर्यंत २६ हजार ७२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ तर हरभरा पिकासाठी ५३ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते; परंतु, प्रत्यक्षात ६७ हजार ७०० हेक्टरवर हरभºयाची पेरणी झाली आहे़ अपेक्षित पेरणी क्षेत्राच्या तुलनेत १२७ टक्के पेरणी हरभºयाची झाली आहे़ अजूनही जिल्ह्यात रबीच्या पेरण्या सुरू आहेत़ त्यामुळे हरभºयाचे क्षेत्र २०० टक्क्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे़ यावर्षी जिल्ह्यात पाणीसाठा उपलब्ध असल्याने कोरडवाहू पिकांपेक्षा बागायती पिकांची पेरणी वाढली आहे़ सर्वसाधारणपणे रबी हंगामात ज्वारी, मका, करडई, सूर्यफूल ही पिके घेतली जातात़ या सर्व पिकांसाठी कमी प्रमाणात पाणी लागते़ मात्र यावर्षी खरीप हंगामामध्ये नगदी पिकांनी धोका दिला़ त्यामुळे रबी हंगामातून चांगले उत्पादन मिळविण्याच्या उद्देशाने गव्हाचा पेरा वाढला आहे़ त्याचबरोबर हरभºयालाही बºयापैकी भाव मिळत असल्याने हा पेराही शेतकºयांनी वाढविला आहे़ त्याचप्रमाणे ६०० हेक्टर क्षेत्रावर मका, १०० हेक्टरवर इतर कडधान्य, ५ हजार २९८ हेक्टरवर करडई, १२ हेक्टरवर जवस आणि ५ हजार ३०० हेक्टरवर इतर गळीत धान्य घेण्यात आले आहेत़ यावर्षीच्या रबी हंगामासाठी कृषी विभागाने २ लाख ७७ हजार ३०० हेक्टर क्षेत्र पेरणीखाली येण्याची अपेक्षा व्यक्त केली होती़ आतापर्यंत २ लाख २० हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ कृषी विभागाच्या अंदाजानुसार ७९़६६ टक्के पेरणी झाली आहे़ अजूनही अनेक भागांत पेरण्या सुरू आहेत़ मात्र ही पेरणी करीत असताना पारंपारिक पिकांऐवजी गहू आणि हरभºयाच्या पिकावर शेतकºयांनी भर दिल्यामुळे या दोन्ही पिकांचे क्षेत्र दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे़परभणी तालुक्यात वाढला पेराहरभºयाचा पेरा परभणी तालुक्यात सर्वाधिक झाला आहे़ तालुक्यातील ११ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली आहे़ गंगाखेड तालुक्यात ८ हजार ९०० हेक्टर, पाथरी ३ हजार ५०० हेक्टर, जिंतूर ६ हजार ९०० हेक्टर, पूर्णा ८ हजार २०० हेक्टर, पालम २ हजार ९०० हेक्टर, सेलू ४ हजार १००, सोनपेठ ५ हजार ७००, मानवत ३ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली आहे़ तर परभणी तालुक्यात ४ हजार ९०० हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे़ गंगाखेड तालुक्यात १ हजार ६०० हेक्टर, पाथरी २ हजार १००, जिंतूर ६ हजार ८००, पूर्णा ५ हजार ३००, पालम १ हजार ६००, सेलू १ हजार ६००, सोनपेठ ६०० हेक्टर आणि मानवत तालुक्यात १ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे़ज्वारीची ७५ टक्के पेरणी४मागील काही वर्षांपासून ज्वारी उत्पादनाकडे शेतकºयांनी पाठ फिरविली आहे़ सातत्याने ज्वारीला दुर्लक्षित केल्यामुळे अलीकडच्या काळात ज्वारीलाही चांगला भाव मिळू लागला आहे़४आरोग्यासाठी पोषक असलेल्या ज्वारीच्या भाकरीला मेट्रो सिटीतील मोठ्या हॉटेल्समधून ग्राहकांची मागणी वाढली आहे़ त्यामुळे गव्हाच्या तुलनेने आता ज्वारीचे भावही वधारले आहेत़ ही बाब लक्षात घेता मागील वर्षीपासून शेतकरी ज्वारीचा पेरा करू लागले आहेत़४यावर्षी कृषी विभागाने १ लाख ५९ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा होण्याचा अंदाज व्यक्त केला होता़ प्रत्यक्षात १ लाख १९ हजार २०० हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला आहे़ त्यामुळे गहू आणि हरभºयाच्या बरोबरीने यावर्षी ज्वारीचेही उत्पादन वाढण्याची शक्यता आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी