शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

परभणीतील स्थिती: सार्वजनिक शौचालयांना बसला पाणीटंचाईचा फटका ; आठ सार्वजनिक शौचालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:46 AM

नागरी स्वच्छता अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी ८ शौचालये पाणी नसल्याने बंद पडली आहेत. बोअर आटल्याने या शौचालयांना चक्क कुलूप लावण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नागरी स्वच्छता अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी ८ शौचालये पाणी नसल्याने बंद पडली आहेत. बोअर आटल्याने या शौचालयांना चक्क कुलूप लावण्याची वेळ आली आहे.परभणी शहरामध्ये नागरी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. यासाठी वैयक्तिक शौचालयांना अनुदान देण्यात आले. शहरातील हगणदारीची स्थळे निष्काशित करुन लाखो रुपये खर्च करुन सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात आली. विशेष म्हणजे, शौचालयांची देखभाल करण्यासाठी कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे गोरगरीब नागरिकांची पाणंदमुक्ती झाली. शहर हगणदारीमुक्त झाल्याचे घोषितही करण्यात आले. परंतु, शहराची हगणदारीमुक्ती अल्पकाळाचीच ठरली आहे. विहीर, बोअरची पाणीपातळी घटली आणि गोरगरीबांच्या हाती पुन्हा एकदा लोटा आल्याचे दिसू लागले आहे.शहरात ६३ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात आली. यापैकी काही शौचालयांची पाहणी शनिवारी करण्यात आली. त्यात ८ शौचालये पाण्याअभावी बंद असल्याचे दिसून आले. शहरातील लोहगाव रोडवरील साखला प्लॉट भागातील सार्वजनिक शौचालयास भेट दिली तेव्हा या ठिकाणी पाणी नसल्याने सांगण्यात आले. हे शौचालय बंद नसले तरी नागरिकांना पाण्याची अडचण सहन करावी लागत आहे. घरुन पाणी न्यावे लागत असल्याचे दिसून आले. बागवान मोहल्ला भागातील सार्वजनिक शौचालय १५ दिवसांपासून बंद आहे. या शौचालयात पाण्याची व्यवस्था आहे. परंतु, फरशीचे काम सुरु असल्याचे कारण देत शौचालय बंद ठेवण्यात आले आहे. गंगाखेड रस्त्यावरील कुकुटपालन परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाला भेट दिली तेव्हा दोन महिन्यांपासून हे सार्वजनिक शौचालय बंद असल्याचे सांगण्यात आले. शौचालय परिसरात घेतलेल्या बोअरची मोटार जळाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी नसल्याने शौचालय बंद ठेवण्यात आले आहे. मोटार जळाल्या संदर्भात महापालिकेला कळविण्यात आले. त्यानंतर काही दिवस टँकरचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले. आता हे पाणीही बंद झाल्याने शौचालयाला कुलूप ठोकावे लागले आहे.गंगाखेडरोडवरच विकासनगर भागातील सार्वजनिक शौचालयांचीही अशीच अवस्था झाली आहे. या सार्वजनिक शौचालय परिसरातील लाईटचा बोर्ड जळाला आहे. त्यामुळे बोअरला पाणी असूनही त्याचा वापर करता येत नाही. परिणामी शौचालय बंद ठेवावे लागत आहे. १५ दिवसांपासून विकास नगरातील शौचालयही बंद आहे. रमाबाई आंबेडकरनगर, आयटीआय-१ येथील सार्वजनिक शौचालय परिसरातील बोअर आटल्याने हे शौचालयही बंद आहेत. अशीच परिस्थिती काद्राबाद प्लॉट, जिल्हा परिषद समोरील शौचालय, अजिजियानगर, पंचवटीनगर येथील शौचालयांची झाली आहे. पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांनाही पाणी टंचाईचा फटका बसला असून ही शौचालये बंद ठेवावी लागत आहेत.उद्घाटनापासून शौचालय बंदचयेथील काद्राबाद प्लॉट परिसरात जिंतूर रस्त्यावर उभारलेले सार्वजनिक शौचालय उद्घाटनापासून बंद असल्याची बाब नागरिकांनी बोलून दाखविली. सार्वजनिक शौचालयाच्या उद्घाटनानंतर चार-पाच दिवस हे शौचालय सुरु होते. त्यानंतर मात्र आजपर्यंत या शौचालयाचे कुलूप उघडले गेले नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या या शौचालयाचा अजूनही नागरिकांना वापर करता आला नाही. जिल्हा परिषदेच्या समोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत सार्वजनिक शौचालयांची उभारणी झाल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर झाली होती. मात्र हे शौचालयही काही काळच सुरु राहिले. त्यानंतर शौचालय बंद पडले आहे. या ठिकाणी पुरेसी पाण्याची व्यवस्था नसल्याने शौचालय बंद असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.आता कुठे मीटरचे कामकाद्राबाद प्लॉट भागात जिंतूर रस्त्यावरील शौचालयाची पाहणी करण्यासाठी जात असतानाच या शौचालयाला अधिकृत वीज पुरवठा घेण्याचे काम सुरु असल्याचे दिसून आले. मागील अनेक दिवसांपासून हे शौचालय केवळ वीज पुरवठा नसल्याने बंद होते. शनिवारी या ठिकाणी वीज पुरवठा घेण्यासाठी मीटर बसविले जात असल्याचे दिसून आले. मीटरची जोडणी झाल्यानंतर तरी शौचालयाचा वापर सुरु होतो की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.घराचे कामही ठप्पसार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी २४ तास वास्तव्य करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांना १ खोली बांधून देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी हे काम झाले आहे. परंतु, गंगाखेडरोडवरील कुकुटपालन परिसरात खोलीचे बांधकामही झाले नाही. त्यामुळे येथील कर्मचाºयांना ऊन आणि पावसापासून बचाव करण्यासाठी शौचालयाच्या आवारातच सहारा घ्यावा लागत आहे. रखडलेले खोलीचे बांधकाम त्वरित पूर्ण केले तर कर्मचाºयांची गैरसोय दूर होऊ शकते.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीelectricityवीज