ऑलिम्पिक खेळाडूंसाठी परभणीत स्वाक्षरी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:47+5:302021-07-18T04:13:47+5:30

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने हे अभियान राबविले जात आहे. ...

Parbhani signature campaign for Olympic athletes | ऑलिम्पिक खेळाडूंसाठी परभणीत स्वाक्षरी अभियान

ऑलिम्पिक खेळाडूंसाठी परभणीत स्वाक्षरी अभियान

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने हे अभियान राबविले जात आहे. १६ जुलै रोजी येथील जिल्हा क्रीडा संकुलात स्वाक्षरी अभियानाचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा, शिक्षणाधिकारी सूचिता पाटेकर, जि. प. सदस्य राजेश फड, सुभाष जावळे, रणजित काकडे, कैलास माने, शिवाजी वाघमारे, विजय तिवारी, कृष्णा कवडी, पांडुरंग रणमाळ, सय्यद शकील, प्रभाकर पंडित, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंनी या स्पर्धेत पदक प्राप्त करावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यातील क्रीडा संघटना तसेच राज्य व राष्ट्रीय खेळाडूंनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी शैलेंद्र गौतम, पंडित चव्‍हाण, संजय मुंडे, सुधीर चपळगावकर, माधुरी जवणे, रमेश खुणे, धीरज नाईकवाडे, प्रकाश पंडित, आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Parbhani signature campaign for Olympic athletes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.