शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

परभणी : जिल्हाभरात शिवसैनिकांचे जेल भरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:56 IST

बोंडअळी अनुदान, पीक विमा, पीक कर्ज अशा विविध प्रलंबित प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. रस्ता अडवून आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी अटक करुन काही वेळानंतर सोडून दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बोंडअळी अनुदान, पीक विमा, पीक कर्ज अशा विविध प्रलंबित प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. रस्ता अडवून आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी अटक करुन काही वेळानंतर सोडून दिले.जिल्ह्यात शेतकरी आणि शेतमजुरांचे प्रश्न प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करुनही या कष्टकºयांना न्याय मिळत नसल्याने खा.बंडू जाधव यांनी शासन, प्रशासनाच्या धोरणाविरोधात जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाºयानुसार १५ जून रोजी सकाळपासूनच जिल्ह्यात शिवसैनिकांनी ठिकठिकाणी रस्ता अडवून आंदोलने केली. परभणी विधानसभा मतदारसंघातील शेतकºयांच्या प्रश्नांवर परभणी-जिंतूर रस्त्यावरील धर्मापुरी पाटीवर आंदोलन करण्यात आले. खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी रस्ता अडवून घोषणाबाजी केली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुरु झालेले आंदोलन अर्धातास चालले. मुख्य रस्ता अडविल्याने दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सदाशीव देशमुख, युवासेनेचे अर्जून सामाले, विधानसभा प्रमुख माणिक पोंढे, संदीप भंडारी, दिलीप आवचार, गजानन देशमुख, माणिक भालेराव, बालासाहेब कदम, नामदेव कदम, अर्जून रणेर, बन्सी भालेराव, भास्कर देवडे, गितेश देशमुख आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी १०० ते १५० शिवसैनिकांना अटक करुन नंतर त्यांची सुटका केली.परभणीसह गंगाखेड, जिंतूर, बोरी, मानवत या ठिकाणीही आंदोलन करण्यात आले. मानवत येथे दुपारी १२ वाजता जि.प.सदस्य विष्णू मांडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या आंदोलनात पं.स.सभापती बंडू मुळे, राजू कच्छवे, संतोष जाधव, बाजार समितीचे संचालक माणिक काळे, नगरसेवक दत्ता चौधरी, शिवाजी उक्कलकर, शिवाजी हिंगे, रामप्रसाद निर्मळ, पिंटू निर्वळ, अनिल कदम यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक मीना कर्डक, सहाय्यक निरीक्षक प्रवीण दिनकर, उपनिरीक्षक शिवशंकर मन्नाळे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.गंगाखेडमध्ये जेल भरोशेतकºयांच्या मागण्यांसाठी खा.बंडू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. तहसील प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी शिवसेना पदाधिकाºयांसह शेकडो शेतकºयांना अटक करुन नंतर सोडून दिले. बाजार समितीचे सभापती बालासाहेब निरस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख डॉ.पंढरीनाथ धोंडगे, विष्णू मुरकुटे, सखुबाई लटपटे, बंडू सोळंके, उपसभापती सारिका शेंडगे, धोंडीराम जाधव, रामकिशन शिंदे, अनिल सातपुते, महारुद्र बेंबळगे, नागनाथ कदम, रामराव पवार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सोनपेठमध्ये आंदोलनयेथील शिवाजी चौकात सकाळी ११ वाजता शिवसेनेने रास्तारोको व जेलभरो आंदोलन केले. आंदोलनानंतर उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे, तालुकाप्रमुख रंगनाथ रोडे, अशोकराव कानमोडे, गणेश पांडुळे, रामेश्वर मोकाशे, अविनाश जाधव, माऊली कदम, जनार्दन झिरपे, रामेश्वर सोलापूरकर, आनंद गुजराथी, भगवान पायघन आदी शिवसैनिकांना पोलिसांनी अटक करुन नंतर सोडून दिले.जिंतूरमध्ये रास्ता रोकोजिंतूर येथे जि.प.गटनेते राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रास्तारोको आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना अटक करुन नंतर सोडून दिले. या आंदोलनात राम शर्मा, कांता धानोरकर, मांगीलाल राठोड, परमेश्वर ठोंबरे, रितेश पांडे, जनक जाधव, गंगाधर मोरे, मधुकर चनईकर, विरुभाऊ बांगर, रमेश संगेकर, अशोक खंडागळे, प्रल्हाद राऊत, लखन माने, संदीप घुगे, रामप्रसाद कंठाळे, किरण देशमुख आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पालममध्ये वाहतूक ठप्पपालम- शहरातील मुख्य चौकामध्ये शिवसेनेने शुक्रवारी दुपारी १ वाजता संतोष मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. प्रारंभी शिवसेना तालुका संपर्क कार्यालयापासून रॅली काढण्यात आली. नवा मोंढा, तहसील कार्यालय, बसस्थानकमार्गे ही रॅली मुख्य चौकात पोहचली. या ठिकाणी अर्धातास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संतोष मुरकुटे, हनुमान पौळ, गजानन पवार, पांडुरंग होलगे, भगवान पाटील, शेख मुक्रम, अर्जून डोंगरे, शिवाजी खंडागळे आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी पोलिांनी चोख बंदोबस्त लावला होता. पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना निवेदन देण्यात आले.सेलूत अटक व सुटकासेलू शहरात शिवसेनेने जेलभरो आंदोलन केल्यानंतर शेकडो आंदोलक शिवसैनिकांना अटक करुन सोडून देण्यात आले. नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात तालुकाप्रमुख रणजीत गजमल, नगरसेवक संदीप लहाने, मनिष कदम, जयसिंग शेळके, सुधाकर पवार, अविनाश शेरे, मंगलताई कथले, काशिनाथ घुंबरे, पांडुरंग कावळे, दत्तराव झोल, बाबा भाबट, अंकुश लोंढे, जिजाभाऊ शेळके, छत्रुघन मगर, गोपाळ कदम, रामभाऊ बहिरट, कैलास गजमल, शेषराव वाघमारे, गोविंद शर्मा यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिकांनी सहभाग नोंदविला.पाथरीत आंदोलनपाथरी शहरातही शिवसैनिकांनी आंदोलन केले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृह परिसरातून शहरातील मुख्य मार्गाने शेतकरी व शिवसैनिक पोलीस ठाण्यात दाखल झाले. या ठिकाणी शिवसैनिकांनी स्वत:ला अटक करुन घेतली. या आंदोलनात तालुकाप्रमुख रविंद्र धर्मे, मुंजाभाऊ कोल्हे, सुरेश ढगे, राहुल पाटील, हरिभाऊ वाकणकर, बाळासाहेब आरबाड, अंगद टेंगसे, पं.स.सदस्य ज्ञानेश्वर शिंदे, शरद कोल्हे, रंगनाथ वाकणकर, सुरेश नखाते, भगवान फासाटे, रावसाहेब निकम आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.दोनशे शिवसैनिकांना घेतले ताब्यातपूर्णा- येथे शेतकºयांच्या प्रश्नांवर जेलभरो आंदोलन करणाºया २०० शिवसैनिकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास झिरो टी पॉईंट येथून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाप्रमुख विशाल कदम, काशिनाथ काळबांडे, प्रकाश कºहाळे, नितीन कदम, शाम कदम, अ‍ॅड. राजेश भालेराव, राजू अण्णा एकलारे, संतोष एकलारे, माधव कदम, राम महाराज बनसोडे, सोपान महाराज बोबडे आदी मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा मिरची बसस्टॅन्ड, मुख्य बाजारपेठ, डॉ.आंबेडकर चौकमार्गे पोलीस ठाण्यात दाखल झाला. या ठिकाणी जेल भरो आंदोलन करण्यात आले.कौसडी फाटा येथे आंदोलनप्रभाकर वाघीकर यांच्या नेतृत्वाखाली कौसडी फाटा येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनात तालुकाप्रमुख भारत पवार, संदीप अंभुरे, हनुमान बोबडे, वैजनाथ कदम, रवि देशमुख, भारत जीवणे, अकबर पठाण, प्रकाश चौधरी, कुंदन देशमुख, सुभाषराव देशमुख यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीShiv SenaशिवसेनाjailतुरुंगFarmerशेतकरी