परभणी : शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास शिवसेना गय करणार नाही- खा.संजय जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:06 AM2019-12-17T00:06:50+5:302019-12-17T00:07:11+5:30

वीज वितरण कंपनीकडून विद्युत रोहित्र, त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. वसुलीच्या नावाखाली गावांचा वीजपुरवठा परस्पर तोडला जातो. मात्र दुसरीकडे वीज चोरीकडे दुर्लक्ष करुन मध्यमवर्गीयांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाकडून निजामकाळातील अन्यायापेक्षा जास्तीचा अन्याय शेतकºयांवर केला जात असल्याचा घणाघात खा.संजय जाधव यांनी केला.

Parbhani: Shiv Sena will not stop if farmers are prevented: Sanjay Jadhav | परभणी : शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास शिवसेना गय करणार नाही- खा.संजय जाधव

परभणी : शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास शिवसेना गय करणार नाही- खा.संजय जाधव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वीज वितरण कंपनीकडून विद्युत रोहित्र, त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. वसुलीच्या नावाखाली गावांचा वीजपुरवठा परस्पर तोडला जातो. मात्र दुसरीकडे वीज चोरीकडे दुर्लक्ष करुन मध्यमवर्गीयांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाकडून निजामकाळातील अन्यायापेक्षा जास्तीचा अन्याय शेतकºयांवर केला जात असल्याचा घणाघात खा.संजय जाधव यांनी केला.
वीज कंपनीतील अधिकाºयांच्या मनमानी कारभाराविरुद्ध शिवसेनेच्या वतीने खा. संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी येथील जिंतूर रोडवरील वीज वितरण कंपनीच्या सर्कल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. खा.जाधव म्हणाले, येथील अधीक्षक अभियंत्यांकडून पैसे घेतल्याशिवाय कामे केली जात नाहीत. ग्रामस्थांना कोणत्याही सूचना न देता आठ- आठ दिवस गावठाणचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. जळालेल्या डी.पी. शेतकºयांना बदलून दिले जात नाहीत. ग्रामीण भागातील ओव्हरलोड विद्युत रोहित्राच्या बाजुला एक नवीन डीपी बसविणे आवश्यक आहे; परंतु, तसे केले जात नाही. त्याचा ताण शेतकºयांवर येत आहे. पीएम, बीएमची कामे अद्यापही सुरु नाहीत. ३३ केव्ही सबस्टेशनमधील दुरुस्तीची कामे केली जात नाहीत. वीज वितरण कंपनीचा कारभार असाच सुरु राहिला तर प्रशासनाला धारेवर धरले जाईल, असा इशारा खा.संजय जाधव यांनी यावेळी दिला. हे आंदोलन सरकारच्या विरोधात नसून प्रशासनाच्या विरोधात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शेतकरी जळालेले विद्युत रोहित्र ने-आण करतात; परंतु, त्याचा मलिदा मात्र एजन्सी व महावितरण प्रशासन संगनमताने खाते. सध्या तर जुन्या रोहित्रातील आॅईल काढून नवीन विद्युत रोहित्रात टाकण्यात येत आहे. त्यामुळे नवीन विद्युत रोहित्र जास्त काळ टिकत नाही. त्याचा फटका शेतकºयांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. विद्युत प्रशासनाने आपल्या भूमिकेत बदल करुन तात्काळ शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
आंदोलनात जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, सदाशिव देशमुख, जि.प. सदस्य विष्णू मांडे, सखूबाई लटपटे, बाळासाहेब जाधव पारवेकर, अर्जुन सामाले, अर्जुन रणेर, मारोती इक्कर, पांडुरंग खिल्लारे दीपक बारहाते, पंढरीनाथ घुले, दामोदर घुले, गणेश इक्कर, प्रा.डॉ.पंढरीनाथ धोंडगे आदींसह शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले
‘विहिरीत पाणी असूनही उपयोग होईना’
४सध्या शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतांना मूबलक पाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर सिद्धेश्वर, येलदरी व जायकवाडी ही प्रमुख धरणेही तुडूंब भरलेली आहेत. रबी हंगामातील पिकांसाठी पाणी पाळी देण्यात येत आहे; परंतु, वीज नसल्याने या पाण्याचाही शेतकºयांना उपयोग होत नाही. त्यामुळे महावितरण प्रशासनाने जनहिताच्या कामासाठी एक पाऊल पुढे टाकून शेतकºयांना तात्काळ विद्युत रोहित्र व लागणाºया विजेच्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी खा.जाधव यांनी यावेळी केली.

Web Title: Parbhani: Shiv Sena will not stop if farmers are prevented: Sanjay Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.