शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सतरा हजारांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 23:50 IST

बकरी ईदनिमित्त ड्राय डे असतानाही चोरुन दारु विक्री करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करीत चार आरोपींच्या ताब्यातून देशी व विदेशी दारुच्या २९२ बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बकरी ईदनिमित्त ड्राय डे असतानाही चोरुन दारु विक्री करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करीत चार आरोपींच्या ताब्यातून देशी व विदेशी दारुच्या २९२ बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.शहरातील खानापूर फाटा येथील अंबाभवानी नगरात आरोपी राहत्या घरी देशी दारुची चढ्या भावाने विक्री करीत असताना पोलिसांनी छापा टाकला. तसेच पाथरी रोडवरील अक्षय ढाब्यासमोर एका रस्त्यालगत मॅकडॉल नं.१ दारु चढ्या भावाने विक्री करीत असताना आरोपीस पकडण्यात आले. तिसरी कारवाई गुरु गोविंदसिंग नगर येथे आणि चौथी कारवाई अंबाभवानी नगरातील कॅनॉललगत करण्यात आली. या प्रकरणी नवा मोंढा, कोतवाली आणि नानलपेठ पोलीस ठाण्यात चारही प्रकरणांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आर. रागसुधा, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेश सिरसकर, हनुमंत जक्केवाड, नीलेश भुजबळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक छगन सोनवणे, संजय घुगे, संजय शेळके, बालाजी रेड्डी, अनिल हिंगोले, कुरवारे, मधुकर चट्टे, सुरेश कापसे, राख, गणेश कौटकर, अरुण पांचाळ, आशा सावंत, सय्यद मोईन, शिवा धुळगुंडे, भगवान भुसारे, हरिश्चंद्र खुपसे, सय्यद मोबीन, सारिका धोत्रे, राजेश आगासे, परमेश्वर शिंदे, जमीर फारोखी आदींनी केली. कारवाईमुळे अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.या आरोपींविरुद्ध नोंदविला गुन्हा४ या कारवायांमध्ये सिद्धार्थ हरिभाऊ खाडे (रा. अंबाभवानी नगर, खानापूर फाटा), श्रावण यलप्पा गायकवाड (रा.अंबा भवानीनगर, परभणी), ओमकेश दिनकर गुट्टे (रा.परभणी)४ आणि गुजरसिंग मेहताब सिंग टाक (रा.गुरु गोविंदसिंह नगर, परभणी) यांच्या ताब्यातून मॅकडॉल नं.१ च्या २५ बाटल्या व देशी दारुच्या २६७ बाटल्या अशा एकूण २९२ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या दारुची किंमत १७ हजार ९५४ रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीliquor banदारूबंदीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी