शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

परभणी : आजपासून गजबजणार जिल्ह्यातील शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:40 IST

दीड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर यावर्षीच्या शैक्षणिक सत्राला १७ जूनपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यातील शाळा विद्यार्थ्यांनी गजबजणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली असून प्रवेशोत्सव, नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार यासह विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दीड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर यावर्षीच्या शैक्षणिक सत्राला १७ जूनपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यातील शाळा विद्यार्थ्यांनी गजबजणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली असून प्रवेशोत्सव, नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार यासह विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.उन्हाळी सुट्या संपल्या असून सोमवारपासून प्रत्यक्ष शाळांना सुरुवात होत आहे. जिल्हा परिषद, खाजगी, अनुदानित, विना अनुदानित शाळांमध्ये नवीन शैक्षणिक सत्राची तयारी सुरु करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक सत्राची जोरदार तयारी केली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्याचे नियोजन केले आहे.यावर्षी परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी बालभारतीच्या वतीने पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके पडावीत, असे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.जिल्ह्यात २ लाख ५५ हजार १८६ लाभार्थी विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांसाठी १४ लाख १९ हजार ८०७ पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत. महिनाभरापासून ही पाठ्यपुस्तके प्रत्यक्ष शाळेवर पोहचती करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटपाचा कार्यक्रमही घेतला जाणार आहे.शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे. तसेच शाळेमध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जाणार आहे. एकंदर शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहपूर्ण वातावरण राहणार आहे. परभणी शहरात विद्यार्थ्यांमध्येही नवीन शैक्षणिक सत्राची उत्सुकता दिसून आली. येथील बाजारपेठेत खरेदीसाठी पालकांनी गर्दी केली होती.रविवार हा सुटीचा दिवस असतानाही बाजारपेठेत गर्दी पाहावयास मिळाली. पाठ्यपुस्तके, वह्या, पेन, कंपास आदी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी, पालक बाजारपेठेत दाखल झाले होते. दफ्तरांबरोबरच शाळांचे गणवेश, बुट, सॉक्स आदी साहित्याची रविवारी खरेदी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्येही उत्साह दिसून आला. दीड महिन्याच्या सुटीनंतर पुन्हा शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी रविवारीच जोरदार तयारी केली. त्यामुळे शिक्षण विभागाबरोबरच विद्यार्थ्यांनीही शाळेच्या पहिल्या दिवसाची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा पुन्हा गजबजणार आहे.तयारीचा घेतला आढावा४जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी एका बैठकीत नवीन शैक्षणिक सत्राच्या तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांची बैठक १३ जून रोजी पार पडली. या बैठकीत केंद्रप्रमुखांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज यांच्यासह शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचीही उपस्थिती होती.तालुकास्तरावर कार्यशाळा४ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढविणे यासाठी २४ ते २९ जून या काळात शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतचे सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आदींच्या उपस्थितीत कार्यशाळा घेतली जाणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थी