शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

परभणी : योजनेच्या सर्वेक्षणास साडेतेवीस कोटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:46 IST

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी इस्त्राईल देशाच्या कंपनीसोबत केलेल्या प्राथमिक करारानुसार पाणीपुरवठा योजनेच्या पूर्व व्यवहाराकरीता अहवाल तयार करण्याच्या सर्व्हेक्षणासाठी राज्य शासन तब्बल २३ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत संबंधित कंपनीला देणार आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात २ कोटी ७७ लाख ११ हजार २४० रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी इस्त्राईल देशाच्या कंपनीसोबत केलेल्या प्राथमिक करारानुसार पाणीपुरवठा योजनेच्या पूर्व व्यवहाराकरीता अहवाल तयार करण्याच्या सर्व्हेक्षणासाठी राज्य शासन तब्बल २३ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत संबंधित कंपनीला देणार आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात २ कोटी ७७ लाख ११ हजार २४० रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.मराठवाड्यात कमी पर्जन्यमानामुळे सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या अनुषंगाने औरंगाबाद येथे ४ आॅक्टोबर २०१६ रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा करण्याच्या योजनेस तत्वत: मान्यता देण्यात आली होती. त्या अनुषंगाने पाणीपुरवठा योजनेचा पूर्वव्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. त्यानुसार २०१८-१९ या वर्षात २० कोटी रुपयांच्या निधीची या कामांकरीता तरतूद करण्यात आली.त्या अनुषंगाने मराठवाड्यातील ग्रीड पद्धतीच्या पाणीपुरवठा योजनेकरीता पूर्वव्यवहार्यता अहवाल तयार करण्याकरीता सर्व्हेक्षण करण्यासाठी व इतर कामांकरीता निधीच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इस्त्राईल देशातील मेकोरुट डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड इंटरप्रायजेस लि. या कंपनीसोबत २१ फेब्रुवारी २०१८ रोजी करार झाला होता. त्यानुसार या सर्व्हेक्षणाच्या कामासाठी सदरील कंपनीला ३३ लाख ७ हजार ६२१ डॉलर (भारतीय कर वगळून) म्हणजेच ७१ रुपये प्रति डॉलर प्रमाणे २३ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्या अंतर्गत या निधीच्या १० टक्के म्हणजेच २ कोटी ३४ लाख ८४ हजार १०२ रुपये आणि जीएसटीचे ४२ लाख २४ हजार १३८ रुपये अशा एकूण २ कोटी ७७ लाख ११ हजार २४० रुपयांच्या निधी वितरणाचा निर्णय नुकताच राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. चालू आर्थिक वर्षातील हा पहिला टप्पा आहे. हा निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या खात्यावर एनईएफटी प्रणालीद्वारे वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर प्राधिकरणकडून तो निधी इस्त्राईलच्या मेकोरेट डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड इंटरप्रायजेस या कंपनीला वितरित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा निधी पाणीपुरवठा व स्वच्छता आणि जिल्हा परिषदांना सहाय्य अनुदाने योजनेंच्या लेखाशिर्षकांतर्गत समाविष्ट करण्यात येणार आहे. परिणामी या बाबतच्या खर्चाची नोंद जिल्हा परिषदांच्या अख्त्यारितच होणार आहे.सर्व्हेक्षणाच्या कामासाठी तब्बल २३ कोटी ४८ लाख रुपये देण्यात येणार असले तरी प्रत्यक्ष सर्व्हेक्षण कधी होईल आणि किती दिवसांत पूर्ण होईल, यासंदर्भातील अधिकृत माहिती मात्र पाणीपुरवठा विभागाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. सर्व्हेक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील निधी वितरणाच्या आदेशात तशी कोणतीही माहिती नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व्हेक्षण अहवालाच्या कालावधीसंदर्भात संभ्रम आहे.मराठवाड्यातील जलसाठ्याचा अभ्यास४मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेकरीता विभागातील जलसाठ्यांचा अभ्यास इस्त्राईलच्या कंपनीने केला होता. या संदर्भातील प्राथमिक लेखाजोखा राज्य शासनाला कंपनीने सादर केला. त्यामध्ये मराठवाड्यात पडणारा पाऊस, धरणात उपलब्ध असलेले पाणी, प्रक्रिया करुन वापरले जावू शकणारे सांडपाणी आदींची माहिती देण्यात आली.तसेच शहरी, ग्रामीण व औद्योगिक पाणी वापराबाबतची माहितीही देण्यात आली. तसेच शेतीसाठीही किती पाण्याचा वापर होऊ शकतो, याचीही प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळ