शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

परभणी : उपचारांवर झाला २९ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:05 AM

राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील १३ हजार ३२ रुग्णांनी वर्षभरात उपचार घेतले असून, त्यांच्या उपचारावर २९ कोटी ६१ लाख ४० हजार ६० रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील १३ हजार ३२ रुग्णांनी वर्षभरात उपचार घेतले असून, त्यांच्या उपचारावर २९ कोटी ६१ लाख ४० हजार ६० रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली़समाजातील गोरगरीब रुग्ण आर्थिक समस्येअभावी वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने राज्यात महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना राबविली जाते़ २१ नोव्हेंबर २०१३ रोजी या योजनेला प्रारंभ झाला़ पूर्वी ही योजना राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने कार्यारत होती़ १३ एप्रिल २०१७ मध्ये शासनाने महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना या नावाने ही योजना सुरू केली आहे़ या योजनेंतर्गत विविध ९७१ आजारांचा समावेश असून, या आजारांवर प्रत्येकाला उपचार मिळावा या उद्देशाने योजना कार्यान्वित करण्यात आली आहे़ जिल्ह्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती केली़या योजनेंतर्गत रेशन कार्ड असणाऱ्या व्यक्तींना योजनेचा लाभ दिला जातो़ त्यात प्रतिवर्षी प्रति कुटूंब दीड लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात येते तर मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपणासाठीही अडीच लाख रुपयांचा लाभ दिला जातो़ विशेष म्हणजे या योजनेंतर्गत कुटूंबातील एका व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना लाभ घेता येतो़ या योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयामध्ये त्या रुग्णाच्या आजारावर नि:शुल्क उपचार केले जातात़ पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी, आवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका असणाºया लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो़परभणी जिल्ह्यात या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१८ पासून ते ३० जूनपर्यंत १३ हजार ३२ रुग्णांनी विविध आजारांवर उपचार घेतले आहेत़ या रुग्णांच्या उपचारावर २९ कोटी ६१ लाख ४० हजार ६० रुपयांचा खर्च झाला आहे़ तर ही योजना सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत ४१ हजार ३६३ रुग्णांना योजनेचा लाभ झाला असून, त्यावर ९८ कोटी ४२ लाख २ हजार ८१८ रुपयांचा खर्च झाला आहे़ विशेष म्हणजे, परभणी जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा असून, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील उपचारांची माहितीही प्रशासनाने ठेवली आहे़१० आॅक्टोबर २०१५ पासून आजपर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ३०२ शेतकºयांनी शेतकरी रेशनकार्डावर योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयालयाने दिली़या आजारांवर होतो उपचारच्या योजनेंतर्गत ९७१ उपचार, शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे़ त्यामध्ये सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतड्यांच्या शस्त्रक्रिया व उपचाऱच्बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था यांच्या आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्णांवरील उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मीक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्याच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मीक उपचार, एंडोक्राईन व इंटरव्हेशनल रेडिओलॉजी उपचारांचा लाभ मिळतो़च्या योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये नि:शुल्क वैद्यकीय सेवा दिली जाते़ वैद्यकीय सेवेमध्ये रुग्णालयातील उपचार, निदानासाठी लागणाºया चाचण्या, आवश्यक औषधोपचार, सुश्रूषा व भोजन आणि परतीचा प्रवासाचा खर्च यांचा समावेश आहे़ त्याच प्रमाणे रुग्णालयातून सुटी केल्यावर पाठपुरावा सेवा दिली जाते़च्तसेच १० दिवसांपर्यंत गुंतागुंत झाल्यास पुढील उपचार मोफत दिले जातात़ या योजनेंतर्गत जास्तीत जास्त आजारांचा समावेश केल्याने रुग्णांनाही त्याचा लाभ होत आहे़ विशेषत: मुंबई, पुणे येथील मोठ्या रुग्णालयांमध्ये ही योजना कार्यरत असल्याने गंभीर आजारांच्या रुग्णांनाही मोफत उपचार मिळू लागले आहेत़नोंदणी करण्याचे आवाहन४महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत रेशनकार्ड आणि आधार कार्ड असणाºया व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो़ जिल्ह्यात अनेक कुटंूबियांनी योजनेचा लाभ घेतला आहे़४या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ई कार्ड दिले जाते़ जिल्हा रुग्णालयात संबंधितांनी नोंदणी केल्यास त्यांना ई-कार्ड दिले जाते़४आतापर्यंत २ हजार ६०० जणांनीच नोंदणी केली आहे़ नागरिकांनी आपले सरकार केंद्राच्या ठिकाणी नोंदणी करून ई-कार्ड प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकारhospitalहॉस्पिटल