परभणी : पिसाळलेल्या गायीचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:10 IST2018-02-20T23:10:03+5:302018-02-20T23:10:45+5:30
शहरातील लोकमान्यनगर आणि परिसरातील इतर वसाहतींमध्ये २० फेब्रुवारी रोजी दुपारी एका पिसाळलेल्या गायीने धुमाकूळ घालत ७ ते ८ महिलांना जखमी केले. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या गायीला पकडण्यात आले.

परभणी : पिसाळलेल्या गायीचा धुमाकूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील लोकमान्यनगर आणि परिसरातील इतर वसाहतींमध्ये २० फेब्रुवारी रोजी दुपारी एका पिसाळलेल्या गायीने धुमाकूळ घालत ७ ते ८ महिलांना जखमी केले. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या गायीला पकडण्यात आले.
शहरातील लोकमान्यनगर आणि जायकवाडी परिसरात मंगळवारी दुपारी एका पिसाळलेल्या गायीने धुमाकूल घातला. रस्त्यावरुन येणाºया- जाणाºयांच्या अंगावर ही गाय धावून जात असल्याने एकच पळापळ झाली होती. दरम्यान या भागातील ७ ते ८ महिलांना गायीने धडक दिल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या भागातील रितेश जैन, नगरसेवक चंद्रकांत शिंदे, महेश शेळके, सागर कारेगावकर, गौतम भराडे हे नागरिकांच्या मदतीला धावले. महापालिकेच्या कोंडवाडा विभागातील अधिकाºयांना पिसाळलेल्या गायीची माहिती दिली. त्यानंतर कोंडवाडा विभाग प्रमुख विनय ठाकूर, डॉ.विनोद नन्नवरे, मनोज गहलोत आदी या भागात दाखल झाले.
दोन ते तीन वेळा गायीने हुलकावणी देत पळ काढला. अखेर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नवा मोंढा पोलीस ठाण्यासमोर या गायीला पकडण्यात यश आले. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.