परभणी: साडेतीन कोटींच्या रस्त्याचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:14 IST2019-04-07T23:13:14+5:302019-04-07T23:14:18+5:30
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत टाकळी कुंभकर्ण ते शहापूर हा साडेचार किमीचा रस्ता मंजूर होवून यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला; परंतु, या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़

परभणी: साडेतीन कोटींच्या रस्त्याचे काम संथगतीने
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत टाकळी कुंभकर्ण ते शहापूर हा साडेचार किमीचा रस्ता मंजूर होवून यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला; परंतु, या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़
परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या रस्त्यावरून शहापूर, तुळजापूर, आर्वी, डिग्रस, गोविंदपूर वाडी, सारंगापूर, इस्माईलपूर, कुंभारी बाजार, कारला आदी गावांतील वाहनधारक दररोज ये-जा करतात़ हा रस्ता परभणी शहराशी जोडला गेल्याने या रस्त्यावर मोठी वर्दळ असते; परंतु, या रस्त्याची दुरवस्था झाल्याने हा रस्ता दुरुस्तीसाठी संबंधित प्रशासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत समावेश केला़
या साडेचार किमी रस्त्यासाठी राज्य शासनाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत मंजूरी दिली; परंतु, चार ते पाच महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही या रस्त्याचे मजबुतीकरणाचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही़ चार दिवस काम सुरू आणि महिनाभर काम बंद अशा पद्धतीने हे काम सुरू आहे़ त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना गिट्टीचा त्रास सहन करावा लागत आहे़ पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे़ त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून वााहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी या मार्गावरील दहा ते पंधरा गावातील ग्रामस्थांमधून होत आहे़
सा़बां़ विभागाचेही दुर्लक्ष
४टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या रस्त्यावर १० ते १५ गावांतील वाहनधारकांची वर्दळ असताना या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे़
४परंतु, या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असतानाही याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देण्यास तयार नाही़ याकडे सा़बां़ विभागाच्या वरिष्ठांनी द्यावे, अशी मागणी आहे़