परभणी : रस्त्याच्या दुरवस्थेने वाहतुकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:01 IST2019-01-31T00:00:35+5:302019-01-31T00:01:04+5:30
शहरातून जाणाऱ्या परळी-सोनपेठ या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याच रस्त्यावरील पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या दुरवस्थेने बुधवारी ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरचा समोरील भाग उंचावल्याची घटना घडली. चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.

परभणी : रस्त्याच्या दुरवस्थेने वाहतुकीस अडथळा
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी): शहरातून जाणाऱ्या परळी-सोनपेठ या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याच रस्त्यावरील पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या दुरवस्थेने बुधवारी ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरचा समोरील भाग उंचावल्याची घटना घडली. चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.
परभणी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर सोनपेठ तालुका वसलेला आहे. तालुक्याची निर्मिती झाल्यापासून ते आतापर्यंत मुलभूत सुविधांचा अभाव आहे. तालुक्यासाठी केवळ सोनपेठ शहरात एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र अद्यापपर्यंत ग्रामीण रुग्णालय येथे सुरू करण्यात आलेले नाही. त्याच बरोबर तालुक्यातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, पक्के रस्ते तयार करावेत, यासाठी सोनपेठ तालुकावासियांनी जवळपास महिनाभर आंदोलने केली. मात्र लेखी आश्वासनाशिवाय तालुकावासियांच्या हाती काहीच लागले नाही. आज ना उद्या तालुक्यातील रस्त्यांचे मजबुतीकरण होईल, या आशेवर तालुकावासिय असतानाच शहरातून जाणाºया परळी-सोनपेठ या मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. शहरातील पोलीस ठाण्यासमोर या मार्गाची अक्षरश: चाळणी झालेली आहे. हा रस्ता दुरुस्त करावा, यासाठी नागरिकांनी अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने नेहमीप्रमाणे नागरिकांच्या पाठपुराव्याला केराची टोपली दाखविली. सध्या तालुक्यात ऊस तोडणी सुरू आहे. ३० जानेवारी रोजी सकाळी वाघाळा येथून सोनपेठकडे येणारा उसाचा ट्रॅक्टर सोनपेठ शहरातील पोलीस ठाण्याजवळील खड्डेयुक्त रस्त्यावर चालकाच्या सतर्कतेमुळे पलटी होण्यापासून वाचला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
वाघाळा ते सोनपेठ या १२ कि.मी. अंतरासाठी ४ तास लागत आहेत. त्याच बरोबर खराब रस्त्यांमुळे ट्रॅक्टरच्या ट्रॉली उलटत आहेत. खड्ड्यांमुळे ट्रॉलीमधील उसाच्या मोळ्या रस्त्यावर पडत आहेत. यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे.
-तुकाराम तिडके, ट्रॅक्टर चालक
सोनपेठ शहरातील पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर सतत पाणी येत असल्यामुळे हा रस्ता नेहमीच खराब होत आहे.
-ए. विघ्ने, उपअभियंता, सोनपेठ