लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: आरटीई कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी जिल्ह्यातील १६८ शाळांनी नोंदणी केली असून या शाळांमध्ये पहिली वर्गासाठी १३९१ तर पूर्व प्राथमिकच्या तीन शाळांमध्ये १६ जागा राखीव ठेण्यात आल्या आहेत.शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार कायम विना अनुदानित, विना अनुदानित, इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळेतील मुख्याध्यापकांना आर्थिक व दुर्बल घटकातील बालकांसाठी आॅनलाईन प्रवेश नोंदणीचे आवाहन केले होते. त्यानुसार ८ फेब्रुवारी ते ४ मार्च या काळात जिल्ह्यातील १६८ शाळांनी नोंदणी केली आहे.या शाळांमध्ये दुर्बल घटकांतील पालकांच्या पाल्यांना प्रवेश दिले जाणार असून आॅनलाईन पद्धतीने त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. ५ ते २२ मार्च या कालावधीत १३ी25ंे्रि२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.२५ टक्के प्रवेशांसाठी मोबाईल अॅपद्वारेही पालकांना अर्ज करता येणार आहेत. अर्जासोबत रहिवासी प्रमाणपत्र, जन्मदाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे.ही सर्व प्रमाणपत्रे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली असावीत. तेव्हा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पालकांनी २५ टक्के राखीव प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
परभणी: जिल्ह्यातील १६८ शाळांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:43 IST