शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

परभणी : अस्वच्छतेमुळे अधिकाºयांची खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:49 AM

राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रविवारी जिल्हा स्टेडियमला भेट दिल्यानंतर या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे क्रीडा विभागातील अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले़ ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे, जळमटे पाहून संतप्त झालेल्या आयुक्तांनी स्वच्छता राखा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रविवारी जिल्हा स्टेडियमला भेट दिल्यानंतर या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे क्रीडा विभागातील अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले़ ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे, जळमटे पाहून संतप्त झालेल्या आयुक्तांनी स्वच्छता राखा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले़महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुनील केंद्रेकर हे शनिवारी परभणी दौºयावर आले असून, जिल्हा स्टेडियमलाही ते भेट देतील, अशी शक्यताही होती़ त्यामुळे येथील स्टेडियम परिसरात स्वच्छता करण्यात आली़ क्रीडा आयुक्तांच्या दौºयानिमित्त येथील अधिकाºयांनी तयारीही पूर्ण केली होती़ मात्र याउपरही परिसरामध्ये कचरा, जाळे दिसून आले़शनिवारी दिवसभरात केंद्रेकर यांनी भेट दिली नसली तरी रविवारी दुपारी १़३० च्या सुमारास सुनील केंद्रेकर जिल्हा स्टेडियममध्ये दाखल झाले़ त्यांच्या समवेत परभणी महापालिकेचे आयुक्त राहुल रेखावार हे देखील उपस्थित होते़ जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे व इतर अधिकाºयांनी त्यांचे स्वागत केले़स्टेडियममध्ये प्रवेश करतानाच केंद्रेकर यांनी अस्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त केली़ त्यानंतर जिल्हा स्टेडियममधील जुन्या बॅडमिंटन हॉलला त्यांनी भेट दिली़ या हॉलमध्ये प्रवेश करताच फरशीवर मोठ्या प्रमाणात धूळ दिसून आली़ त्यामुळे केंद्रेकर पुन्हा संतप्त झाले़ दररोज स्वच्छता होत नाही का, असा सवाल करीत बॅडमिंटन हॉलची जबाबदारी ज्या अधिकाºयांकडे आहे त्यांना बोलावून घेत व्यवस्थित कामे करा, अशा सूचना केल्या. तसेच याच ठिकाणी हॉलच्या छताला लागलेले जळमटेही त्यांच्या नजरेतून सुटली नाहीत. त्यानंतर मग केंद्रेकर यांनी अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढली़ बॅडमिंटन हॉलमध्ये धुळीबरोबरच जुन्या वस्तूही याच ठिकाणी ठेवल्या होत्या़ याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला़

या हॉलची पाहणी केल्यानंतर केंद्रेकर यांनी क्रीडा विभागातील अधिकाºयांची बैठक घेतली़ यावेळी अधिकाºयांना क्रीडा विषयक विविध सूचनाही त्यांनी केल्या़ या बैठकीनंतर केंद्रेकर यांनी थेट मैदानाची पाहणी केली़ या पाहणीतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ जिल्हा स्टेडियममधील मैदानावर मोठ्या प्रमाणात धूळ दिसून आली़ तसेच मैदानाच्या प्रवेशद्वारावरच कचरा पडलेला होता़ त्यामुळे संतप्त होत स्वच्छता राखा, जीव ओतून काम करा, अडचणी मांडण्यापेक्षा त्यावर मात करा, लोकांचा सहभाग वाढवा, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाºयांना दिल्या़केंद्रेकर यांनी सुमारे दोन तास जिल्हा स्टेडियमच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि एका महिन्यात कामात सुधारणा करीत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या.अधिकाºयांची उडाली धांदलजिल्हा स्टेडियमला भेट देण्यासाठी आलेल्या सुनील केंद्रेकर यांनी सुरुवातीपासूनच अस्वच्छता आणि असुविधांविषयी संताप व्यक्त केल्याने अधिकाºयांची चांगलीच धांदल उडाली़ जिल्हा स्टेडियममध्ये अनेक असुविधा आहेत़ धुळीबरोबरच इमारतीचीही दुरवस्था झालेली आहे़ ही दुरवस्था पाहून केंद्रेकर यांनी संताप व्यक्त केला़ तुम्हाला अस्वच्छता दिसत नाही का? तुम्ही काय करता? असा सवाल करीत अधिकाºयांना स्वच्छतेविषयी धारेवर धरले़ त्याच प्रमाणे मुख्यालय सोडून गेल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला़ कामकाजात बदल करून सुविधा निर्माण करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले़भ्रष्टाचार झाला तर कारवाईजिल्हा क्रीडा संकुलातील अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त करीत असतानाच केंद्रेकर यांनी भ्रष्टाचाराविषयीही अधिकाºयांना कडक शब्दांत सूचना केल्या़ भ्रष्टाचार झाल्याची एकही तक्रार माझ्यापर्यंत आली तर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी तंबीच त्यांनी दिली़