शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रबीचे दोन लाख हेक्टर क्षेत्र राहणार पडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:38 IST

कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने यावर्षी २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने यावर्षी २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे़यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी केलेली सोयाबीन, कापूस, मूग व उडीद ही पिके पावसाअभावी शेतकºयांच्या हातून गेली आहेत़ त्यामुळे उसणवारी करून पिकांवर खर्च केला़ परंतु, उत्पादनातून तेवढे पैसेही शेतकºयांच्या हाती लागले नाहीत़ त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांच्या आशा परतीच्या पावसावर होत्या़ परंतु, आॅक्टोबर संपत आला तरीही जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नाही़ परिणामी कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामासाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़ यामध्ये ज्वारी पिकासाठी १ लाख ११ हजार ९६०, गव्हासाठी ३७ हजार २९६, हरभºयासाठी १ लाख २३ हजार ३९०, करडईसाठी २ हजार ५४९ तर मक्यासाठी १८ हजार ३८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे; परंतु, या वर्षीच्या पावसाळ्यात एकही समाधानकारक पाऊस झाला नाही़ त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली आहे़त्यामुळे विहीर, नदी, तलाव, ओढे यांना पाणीच आले नाही़ जिल्ह्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरलेला निम्न दूधना प्रकल्प व येलदरी धरणातही समाधानकारक पाणीसाठा झाला नाही़ त्यामुळे या धरणातील पाणी शेतकºयांना रबी हंगामातील पिके जगविण्यासाठी उपलब्ध होणार नाही़ सध्या शेतकºयांनी खरिप हंगामातील पिकांची विल्हेवाट लावून रबी हंगामातील पेरणीसाठी शेतजमीन तयार केली आहे़; परंतु, २० आॅगस्टपासून जिल्ह्यात पाऊस झालेला नाही़ त्यामुळे ठिक ठिकाणी जमीन भेगाळली आहे़ या जमिनीवर पेरणी करावी कशी? असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे़ ज्या शेतकºयांकडे सध्या पाणी उपलब्ध आहे; परंतु, हे पाणी रबी हंगामातील सिंचनासाठी पुरेल की नाही या भीतीने शेतकºयांनी चाढ्यावर मूठ धरली नाही़२१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे एकरभर क्षेत्रावरही पेरणी झाल्याची नोंद नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ यावर्षीचा रबी हंगाम शेतकºयांची अग्नीपरीक्षा पाहणारा ठरणार आहे़कृषी निविष्टा व्यवसायही धोक्यात४यावर्षीच्या रबी हंगामात कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार शेतकºयांना बियाणांची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानेही ४२ हजार ५६९ क्विंटल बियाणांचे नियोजन केले आहे़ त्याचबरोबर हजारो मे़ टन खतही उपलब्ध आहे़ परंतु, २१ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कोठेच पेरणी झाली नसल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील ११ बाजार समित्यांच्या मार्केटयार्डात लाखो रुपयांच्या कृषी निविष्टा पडून असल्याने व्यापाºयांची चिंताही वाढली आहे़४ खरिपापाठोपाठ रबी हंगामही शेतकºयांच्या हातून गेला आहे़ त्यामुळे येणारे आर्थिक वर्ष शेतकºयांसाठी प्रशासन व शासन यांच्या मदतीवरच अवलंबून आहे़ शेतकºयांच्या पडत्या काळात शासनाने मदत केल्यास शेतकºयांना धीर मिळणार आहे़१० टक्के क्षेत्रावरच होणार पेराकृषी विभागाने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र म्हणजेच पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्र रबी हंगामासाठी प्रस्तावित केले आह; परंतु, गेल्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात पावसाचा थेंबही बरसला नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील केवळ १० टक्के क्षेत्रावरच उपलब्ध पाण्यावर पेरणी होऊ शकते, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला़ त्यामुळे येणारा काळ शेतकºयांसाठी कठीण राहणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस