शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीचा प्रश्न गंभीर : २५ दिवसांचेच पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:53 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील बंधाºयात केवळ २५ दिवसांचेच पाणी शिल्लक असून, आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे़ या नियोजनावर १७ आॅक्टोबर रोजी मुंबईत होणाºया बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील बंधाºयात केवळ २५ दिवसांचेच पाणी शिल्लक असून, आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे़ या नियोजनावर १७ आॅक्टोबर रोजी मुंबईत होणाºया बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे़परभणी शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयामध्ये पाणी संपत आले आहे़ सध्या या बंधाºयात केवळ २५ ते ३० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे़ बंधाºयातील उपलब्ध पाणी जास्तीत जास्त दिवस पुरविण्यासाठी प्रशासनाला कडक उपाययोजना कराव्या लागणार आहेत़ जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईचे संकट आतापासूनच गंभीर होत चालले आहे़ पुढील वर्षातील पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी वापरावे लागणार असल्याने आतापासूनच पाणी आरक्षणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठक झाली़ या बैठकीत महानगरपालिका प्रशासनाने परभणी शहरासाठी पुढील वर्षातील जुलै महिन्यापर्यंत ८ दलघमी पाणी लागेल, असा अहवाल दिला आहे़ परभणी शहराला येलदरी येथील धरणातून पाणी घेतले जाते़ येलदरी प्रकल्पात पाणीसाठा जमा झाला नसल्याने दोन वर्षांपासून येलदरी प्रकल्पातून राहटी बंधाºयासाठी पाणी मिळत नाही़ परिणामी शहरवासियांना निम्न दूधना प्रकल्पातून पाणी घ्यावे लागते़ मात्र यावर्षी निम्न दूधना प्रकल्पातही पुरेसा पाणीसाठा नसल्याने या प्रकल्पातून किती पाणी मिळते? यावरच परभणीकरांच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे़ दरम्यान, महानगरपालिकेने केलेल्या नियोजनानुसार येलदरी प्रकल्पातून चार पाणी पाळ्या आणि निम्न दूधना प्रकल्पातून दोन पाणी पाळ्या घेण्याचे निश्चित केले आहे़ हा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर केला असून, बुधवारी मुंबई येथे पाणी आरक्षणाच्या संदर्भात आयोजित बैठकीत या आरक्षणाला मंजुरी मिळणार आहे़ राहटी येथील बंधाºयाची पाणी साठवण क्षमता १़५२ दलघमी एवढी आहे़ एक पाणी पाळी घेतल्यानंतर शहरवासियांना ४५ दिवस हे पाणी पुरते़ साधारणत: ८ दलघमी पाणी शहराला लागणार आहे़असे करावे : लागेल आरक्षणजुलै महिन्यापर्यंत परभणी शहराला ८ दलघमी पाणी लागणार आहे़ राहटी बंधाºयात ८ दलघमी पाणी घेण्यासाठी प्रत्यक्षात प्रकल्पांमध्ये तिप्पट पाण्याचे आरक्षण करावे लागते़ परभणी शहराला येलदरी धरणातून पाण्याचे आरक्षण केल्यास येलदरी धरणाचे पाणी सिद्धेश्वर धरणात सोडले जाते़ सिद्धेश्वरपासून राहटी बंधारा ४७ किमी अंतरावर आहे़ प्रत्येक पाणी पाळीच्या वेळी १ दलघमी पाणी घेतले जाते़ हे पाणी बंधाºयात पोहचण्यासाठी प्रकल्पातून किमान ५ ते ७ दलघमी पाणी सोडावे लागते़ तसेच निम्न दूधना प्रकल्पातून पाणी घेण्यासाठीही आरक्षित पाण्याच्या तुलनेत तीनपट अधिक पाणी नदीपात्रात सोडावे लागते़ निम्न दूधना प्रकल्पापासून राहटी बंधारा ६५ किमी अंतरावर असून, या अंतरानुसार आरक्षित पाणी देण्यासाठी त्या पटीने नदीपात्रात पाणी सोडावे लागते़बंधाºयाच्या प्लेट बदलणारराहटी बंधाºयाच्या निर्मितीपासून आजपर्यंत प्लेट बदलल्या नाहीत़ त्यामुळे जुन्या झालेल्या या प्लेटमधून पाण्याची गळती होत असल्याने नवीन प्लेट टाकण्याचे नियोजन वसमत येथील पूर्णा पाटबंधारे विभागाने तयार केले आहे़ सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा संपल्यानंतर बंधाºयाच्या प्लेट बदलण्याचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती मिळाली़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीDamधरण