लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी ते मानवत रोड दरम्यानच्या रेल्वेमार्गावर परभणीहून पान्हेरा, देऊळगाव आवचारकडे जाणाऱ्या रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने रेल्वे रुळाखाली भुयारी मार्ग उभारण्यात आल्याने शेतकरी, ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे.परभणी तालुक्यातील पान्हेरा, मोहपुरी, देऊळगाव आवचारसह ४० ते ५० गावांना जाण्यासाठी परभणी- मानवत रोड रेल्वेमार्गावर पान्हेरा नजीक उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. तशी या भागातील ग्रामस्थांची मागणी होती; परंतु, रेल्वे प्रशासनाने या संदर्भात काळजी न घेता लोहमार्गाखाली भुयारी मार्ग तयार केला आहे.या भुयारी मार्गातून ट्रॅक्टर, ट्रक किंवा अन्य मोठी वाहने जाऊच शकत नाहीत. शिवाय पावसाळ्यातही या भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने येथील ग्रामस्थांनी आंदोलने केली होती; परंतु, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
परभणी : भुयारी पुलामुळे ग्रामस्थांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:47 IST