परभणी : नृसिंह जन्मोत्सवाची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:29 IST2019-05-09T00:29:12+5:302019-05-09T00:29:30+5:30

तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याची तयारी अंतीम टप्प्यात आली असून, १२ मेपासून या सोहळ्याला प्रारंभ होत आहे़

Parbhani: Preparations for Nrusingh Janmotsava | परभणी : नृसिंह जन्मोत्सवाची तयारी सुरू

परभणी : नृसिंह जन्मोत्सवाची तयारी सुरू


लोकमत न्यूज नेटवर्क
पोखर्णी नृ. (परभणी): तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याची तयारी अंतीम टप्प्यात आली असून, १२ मेपासून या सोहळ्याला प्रारंभ होत आहे़
श्रीक्षेत्र पोखर्णी येथे नृसिंहाचे मंदिर असून, दरवर्षी या ठिकाणी जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात़ यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह व श्री नृसिंह कथेचे आयोजन केले आहे़ सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्था नृसिंह संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने मोफत करण्यात आली आहे़, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष एम़ आऱ वाघ यांनी दिली़
अखंड हरिनाम सप्ताह व श्रीनृसिंह पुराण कथा कार्यक्रमासाठी सभामंडप उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे़ मंदिराचे सुशोभिकरणही करण्यात आले आहे़ तसेच भजन, कीर्तनासाठीही सभामंडप उभारण्यात आला आहे़ उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सभामंडपात पंखे, कुलर्स आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ राज्यभरातून या जन्मोत्सवासाठी भाविक पोखर्णी येथे दाखल होतात़ १९ मेपर्यंत हा सोहळा चालणार असून, सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत़

Web Title: Parbhani: Preparations for Nrusingh Janmotsava