शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

परभणी : पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी बनविण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:51 AM

येथील रिक्त असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या पोट निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्या अद्यावत करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून २९ मे पर्यंत याद्या अद्यावत केल्या जाणार आहेत. या पदासाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोट निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): येथील रिक्त असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या पोट निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्या अद्यावत करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून २९ मे पर्यंत याद्या अद्यावत केल्या जाणार आहेत. या पदासाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोट निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गाला सुटले होते. शिवकन्या स्वामी यांनी या प्रवर्गातील माला जंगम या जातीचे प्रमाणपत्र जोडून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुकीत अर्ज दाखल केला होता. कॉँग्रेसचे उमेदवार बाबूराव नागेश्वर यांचा पराभव करून स्वामी विजयी झाल्या होत्या. मात्र जात पडताळणी समितीने शिवकन्या स्वामी यांचे जात प्रमाणपत्र २१ जुलै रोजी अवैध ठरविले होेते. मात्र स्वामी यांनी या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.सुनावणी दरम्यान, ८ आॅगस्ट २०१८ रोजी निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळविण्यात स्वामी यांना यश आले होते. मात्र २२ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने अंतिम न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून पोट निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी दिली. या आधारे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रारुप मतदार याद्या करण्याचे लेखी आदेश दिले. या आदेशानुसार मतदार याद्या अद्यावत करण्याची लगबग पालिकेत सुरू झाली आहे. १७ मे रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, २१ मे पर्यंत प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल केल्या जाणार आहे. २७ मे रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, २९ मे रोजी मतदान केंद्रांची प्रसिद्धी आणि मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मतदार यादीचा कार्यक्रम संपल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.निवडणुकीचा निर्णय न्यायालयाच्या आधीन४जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नगराध्यक्ष शिवकन्या स्वामी यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होेते. या निर्णयाच्या विरोधात स्वामी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश २२ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने दिले होते. त्यावरून राज्य निवडणूक आयोगाने पालिकेच्या रिक्त असलेल्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे.४दुसरीकडे या प्रकरणात उच्च न्यायालयात जात पडताळणी समितीच्या निर्णयाच्या विरोधात सुनावणी सुरू आहे. या संदर्भात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तारीख असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतो? याकडे सत्ताधारी गटासह विरोधकांचे लक्ष लागले आहे.४शिवकन्या स्वामी यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्याने ३ आॅगस्ट २०१८ रोजी उपाध्यक्ष राणी अंकुश लाड यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा पदभार सोपविण्यात आला होता. मागील नऊ महिन्यांपासून मानवत नगराध्यक्षपदाचा पदभार लाड यांच्याकडेच आहे. सध्या नगरपालिकेत मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक