शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

परभणी :२२० एकर जमीन केंद्राच्या ताब्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:27 AM

कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराजवळून जाणाºया वळण रस्त्यासाठी गाव आणि शेतकºयांच्या नावांसह थ्री डी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या अंतर्गत बाह्य वळण रस्त्यासाठी संपादित करावयाची परभणी तालुक्यातील पाच गावांतील सुमारे २२० एकर जमीन अप्रत्यक्षरीत्या केंद्र शासनाच्या ताब्यात आल्याने लवकरच बाह्यवळण रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराजवळून जाणाºया वळण रस्त्यासाठी गाव आणि शेतकºयांच्या नावांसह थ्री डी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या अंतर्गत बाह्य वळण रस्त्यासाठी संपादित करावयाची परभणी तालुक्यातील पाच गावांतील सुमारे २२० एकर जमीन अप्रत्यक्षरीत्या केंद्र शासनाच्या ताब्यात आल्याने लवकरच बाह्यवळण रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली आहे.कल्याण ते निर्मल या २२२ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहरालगत १४.५ कि.मी. अंतराचा बाह्यवळण रस्ता तयार केला जाणार आहे. सध्या पाथरी आणि मानवत तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. परभणीे शहर वळगता वसमत ते नांदेडपर्यंत कामाला प्रारंभही झाला आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराबाहेरुन वळण रस्ता काढण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया दोन वर्षापासून सुरु आहे. विशेष म्हणजे, या जमिनीचे मोजणीचे कामच दोन वेळा झाले. एक वेळा थ्री ए अधिसूचनाही रद्द झाली होती. त्यानंतर मार्च २०१७ मध्ये या अधिसूचनेची पूर्नप्रसिद्धी करण्यात आली. संबंधित शेतमालकांच्या हरकती मागवून त्यावर सूचनावणी झाली आणि थ्री ए अधिसूचना पूर्ण करुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतु, थ्री डी अधिसूचना प्रकाशित होण्यासही विलंब लागत होता. ही बाब लक्षात घेऊन खा. बंडू जाधव यांनी केंद्रीय रस्ते व दळण वळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या प्रबंधक महासंचालकांनी या प्रकरणी गतीने कारवाई करीत या रस्त्याची अधिसूचना भारतीय राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.परभणी शहराबाहेरुन जाणाºया बाह्य वळण रस्त्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने आता रस्ता तयार करण्याच्या कामातील ८० टक्के अडथळे दूर झाले आहेत.खा. बंडू जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असून बाह्यवळण रस्त्यासाठी संपादित करावयाची २२० एकर जमीन अप्रत्यक्षरीत्या केंद्र शासनाच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे कामाला गती येईल, अशी आशा आहे.असा आहे बाह्यवळण रस्ता४परभणी शहरापासून साधारणत: ६ कि.मी. अंतरावर पाथरी रस्त्यावरील सरस्वती डेंटल कॉलेजपासून बाह्य वळण रस्त्याला सुरुवात होणार आहे. जिंतूररोड ओलांडून हा रस्ता पुढे वसमत रोडवरील असोला पाटीजवळ निघणार आहे. पारवा, धर्मापुरी, परभणी आणि वांगी या गावांच्या शिवारातील सुमारे २२० एकर जमीन या रस्त्यासाठी संपादित केली जाणार आहे. १४.५ कि.मी. अंतराचा हा बाह्य वळण रस्ता असेल, अशी माहिती शिवसेनेचे प्रवीण देशमुख यांनी दिली.पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लावा४राष्ट्रीय महामार्गाला बाह्य वळण रस्ता निर्माण होणार असला तरी परभणी शहरातून जाणारा वसमत रस्ताही राष्ट्रीय महामार्गाचाच भाग आहे. मात्र या रस्त्यावर पथदिव्यांची सुविधा नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते दत्तधाम या रस्त्यावर एलईडी पथदिवे बसविण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. जिल्हा विकास निधीतून या पथदिव्यांसाठी निधी उपलब्ध झाल्यास महामार्ग उजळून निघणार आहे.