परभणी : पाथरीत एक हजार झाडांची दुतर्फा लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:31 IST2019-07-17T00:31:08+5:302019-07-17T00:31:16+5:30
शहरातील रस्त्याच्या दुतर्फा एकाच दिवशी एक हजार मोठी झाडे लावण्याचा उपक्रम आ.बाबाजानी दुर्राणी यांनी राबविला.

परभणी : पाथरीत एक हजार झाडांची दुतर्फा लागवड
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): शहरातील रस्त्याच्या दुतर्फा एकाच दिवशी एक हजार मोठी झाडे लावण्याचा उपक्रम आ.बाबाजानी दुर्राणी यांनी राबविला.
१५ जुलै रोजी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते बाबुलतार रोडवर अंबा, चिंच आदी झाडे दुतर्फा लावण्यात आली. यावेळी मुंजाजी भाले पाटील, दादासाहेब टेंगसे, अनिल नखाते, कुंडलिक सोगे, चक्रधर उगले, सुभाष कोल्हे, माधवराव जोगदंड, अशोक गिराम, हन्नान खान, राजीव पामे, एकनाथ शिंदे, नितेश भोरे, किरण भाले, एकनाथ घांडगे, युसूफोद्दीन अन्सार, मोईज अन्सारी, तुकाराम जोगदंड, एजाज खान, मुक्तार अली, हसीब खान, अलोक चौधरी, संजय रणेर, अजय थोरे, सदाशिव थोरात, राजू ढगे आदींची उपस्थिती होती.