शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कापसीकरांचे पिण्याच्या पाण्यासाठी होताहेत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:42 IST

मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये तालुक्यातील कापशी या गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानात मागील दोन वर्षापासून गावात कामे चालू आहेत; परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी कापशीकरांचे अतोनात हाल होत असून घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थ व महिलांंना २ कि.मी.ची पायपीट करीत भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये तालुक्यातील कापशी या गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानात मागील दोन वर्षापासून गावात कामे चालू आहेत; परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी कापशीकरांचे अतोनात हाल होत असून घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थ व महिलांंना २ कि.मी.ची पायपीट करीत भटकंती करावी लागत आहे.गंगाखेड ते पालम राष्ट्रीय महामार्गापासून २ कि.मी. अंतरावर कापशी हे गाव आहे. या गावची लोकसंख्या १२०० असून पिण्याच्या पाण्यासाठी गावाशेजारच्या पाझर तलावावर अवलंबून राहावे लागते. २०१६ मध्ये शासनाने मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानात या गावाची निवड केली आहे. या अभियानात निवड झाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासह गावातील प्रश्न सुटतील अशी अपेक्षा होती; परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. पाझर तलाव आटल्याने व गावाजवळून गेलेली नदी कोरडी पडल्याने गावाच्या शिवारात पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. जलसंधारणाची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. दुष्काळ पडल्याने गावाजवळ पिण्याच्या पाण्याचे स्रोत नसल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. घागरभर पाण्यासाठी रात्रंदिवस जागरण करून २ कि.मी. पायपीट जानेवारी महिन्यापासून सुरू झाली आहे. आणखी दोन महिने पिण्याच्या पाण्यासाठी काय होणार? या भितीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. शासनाने ग्रामपरिवर्तन अभियानात गावाची निवड करूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने लक्ष देऊन कापसीमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.खाजगी टँकरवर भागतेय तहानपिण्याच्या पाण्यासाठी गावानजिक पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. पालम शहरातून पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकर बोलविण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. एका टँकरला २ हजार रुपये खर्च करून ७ हजार लिटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. दोन-तीन कुटुंब एकत्र येऊन खासगी टँकर मागून घेत आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात ग्रामस्थांच्या खिशाला झळ बसत आहे.अधिग्रहणाचे प्रस्ताव देऊनही दुर्लक्षपिण्याच्या पाण्यासाठी मागील महिनाभरापासून पंचायत समितीकडे टँकर व विंधन विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे; परंतु, या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचारी निवडणुकीचे काम सांगून प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालयात तर कर्मचारी ग्रामस्थांना माहिती देताना उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संकटाचा सामना करावा लागत आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई