परभणी : अवैध गौण खनिज प्रकरणी वाढविला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:36 IST2018-02-08T00:36:17+5:302018-02-08T00:36:32+5:30
जिल्ह्यातील गौण खनिजांचा अवैध उपसा करून वाहतूक केल्यास संबंधिताविरूद्ध दंडात्मक रकमेत मोठी वाढ केल्याने अवैध उत्खनन करणे महागात पडणार आहे़

परभणी : अवैध गौण खनिज प्रकरणी वाढविला दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील गौण खनिजांचा अवैध उपसा करून वाहतूक केल्यास संबंधिताविरूद्ध दंडात्मक रकमेत मोठी वाढ केल्याने अवैध उत्खनन करणे महागात पडणार आहे़
महाराष्ट्र शासनाने या संदर्भात दंड आकारण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली असून, या नवीन अधिसूचनेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (८) च्या तरतुदीनुसार अवैध गौण खनिज अनधिकृतरीत्या उपसा करणे, त्याची वाहतूक करणे, साठा करून ठेवणे किंवा या गौण खनिजाची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्र सामुग्रीचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते़ नव्या तरतुदीनुसार अनधिकृत गौण खनिज काढण्यासाठी ड्रिल मशीनचा वापर झाला तर २५ हजार रुपये, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, हाफ बॉडी ट्रक, सक्शन पंप वापरल्यास १ लाख रुपये, एक्सकॅवेटर, मेकॅनाईज्ड लोडरचा वापर झाल्यास ७ लाख ५० हजार रुपये एवढी शास्तीची रक्कम प्रदान केल्यानंतरच संबंधितास वैयक्तिक जात मुचलका सादर केल्यानंतर सोडण्यात येणार आहे़, अशी माहिती उपविभागीय अधिकाºयांनी दिली़