परभणी : राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 23:50 IST2019-10-08T23:50:13+5:302019-10-08T23:50:41+5:30
विजयादशमी सणानिमित्त राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी ८ आॅक्टोबर रोजी शहरातील प्रमुख मार्गावरुन पथसंचलन केले.

परभणी : राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विजयादशमी सणानिमित्त राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी ८ आॅक्टोबर रोजी शहरातील प्रमुख मार्गावरुन पथसंचलन केले. विजयादशमी उत्सवानिमित्त दरवर्षी राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातून पथसंचलन केले जाते. मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास येथील शारदा महाविद्यालयात प्रार्थनेनंतर या पथसंचलनास प्रारंभ झाला. शिवाजी चौक, कच्छी लाईन, कोमटी गल्ली, क्रांती चौक परत गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठ मार्गे शारदा विद्यालयात पथसंचलनाचा समारोप झाला. यावेळी जिल्हा संघचालक डॉ.केदार खटींग आदी स्वयंसेवक सहभागी झाले होते.