परभणी : संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:35 IST2020-02-12T00:35:17+5:302020-02-12T00:35:42+5:30
संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणी शहरात नागरिकांच्या वतीने पालखी सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधवांचा सहभाग होता.

परभणी : संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणी शहरात नागरिकांच्या वतीने पालखी सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधवांचा सहभाग होता.
शहरातील गांधी पार्क भागातून सकाळी संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, शिवाजीरोड, नानलपेठ, विद्यानगर कॉर्नर, सरस्वतीनगर, पारदेश्वर महाराज मंदिर, बेलेश्वर महादेव मंदिरमार्गे ही पालखी नांदखेडा रस्त्यावरील संत नरहरी महाराज यांच्या मंदिरात आणण्यात आली. यावेळी भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे व महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.