परभणी :विजेच्या धक्क्याने एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:34 IST2018-02-05T00:34:16+5:302018-02-05T00:34:25+5:30
विजेच्या खांबावर काम करीत असताना शॉक लागल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाजवळील शेतात घडली़ या घटनेत एक जण जखमी झाला आहे़

परभणी :विजेच्या धक्क्याने एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (जि. परभणी) : विजेच्या खांबावर काम करीत असताना शॉक लागल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाजवळील शेतात घडली़ या घटनेत एक जण जखमी झाला आहे़
सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील ज्ञानेश्वर नारायण नवल (२७) व सोपान रामभाऊ पाठमोरे (कावी ता़ जिंतूर) हे दोघे ४ फेब्रुवारी रोजी सकाळी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उत्तमराव माने यांच्या शेतात वीज खांबावरून तार ओढण्याचे काम करीत होते़ याच वेळी परिसरातून गेलेल्या ११ केव्ही वीज वाहिनीच्या तारेला स्पर्श झाल्याने दोघेही जमिनीवर कोसळले़ या घटनेत ज्ञानेश्वर नारायण नवल (२७) यांचा जागीच मृत्यू झाला असून, सोपान पाठमोरे हे जखमी झाले आहेत़
पाथरी शहरापासून ४ किमी अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत ही घटना घडली़ या प्रकरणी जखमी सोपान पाठमोरे यांनी दिलेल्या खबरीवरून पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद झाली आहे़ पोलीस निरीक्षक व्ही़व्ही़ श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत़