परभणी : गंगाखेडमध्ये दीड क्विंटल प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 00:11 IST2020-01-08T00:11:03+5:302020-01-08T00:11:42+5:30
प्लास्टिकमुक्त शहर अभियानांतर्गत ७ जानेवारी रोजी गंगाखेड शहरातून रॅली काढण्यात आली. त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बाजारपेठ भागातून दीड क्विंटल प्लास्टिक जप्त केले आहे.

परभणी : गंगाखेडमध्ये दीड क्विंटल प्लास्टिक जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : प्लास्टिकमुक्त शहर अभियानांतर्गत ७ जानेवारी रोजी गंगाखेड शहरातून रॅली काढण्यात आली. त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बाजारपेठ भागातून दीड क्विंटल प्लास्टिक जप्त केले आहे.
राज्य शासनाने प्लास्टीकच्या पिशव्यांचा वापर करण्यास बंदी घातली असताना शहरात प्लास्टिक पिशव्यांसह प्लास्टिकच्या वस्तूंचा सर्रास वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली. नगरपरिषद कार्यालय ते भगवती चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थी, महिला बचत गटाच्या सदस्यांनी रॅलीत सहभाग नोंदविला. या रॅली दरम्यान नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे ग्लास इतर वस्तू असे सुमारे १ क्विंटल ४० किलो प्लास्टिक साहित्य जप्त केले.
या रॅलीत उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे, प्रकल्प अधिकारी अंजना बिडगर, जयमाला हजारे, सावित्रीबाई वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा लक्ष्मीताई आडे, सविता राखे, रत्नमाला चंद्रमोरे, सुरेखा राठोड, सूर्यमाला मोतीपवळे, सुुनिताताई घाडगे, शेख फरजाना, लक्ष्मीताई खरात, अफजलबी कुरेशी, अंजना केंद्रे, शकुंतला गिरी, शमीमबी कुरेशी, सुनीता दिनकर, भारती कांबळे, ज्योती कुरुंदकर आदींनी सहभाग नोंदविला.
...तर दंडात्मक कारवाई
४नगरपरिषद कार्यालय परिसरात रॅलीचा समारोप झाला. याप्रसंगी मुख्याधिकारी नानासाहेब कामटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत बंदी असलेल्या प्लास्टीकच्या वस्तूंचा वापर न करण्याचे आवाहन केले. तसेच प्लास्टिकच्या पिशव्या वापरताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी नगरसेवक सुनील चौधरी, सत्यपाल साळवे, तुकाराम तांदळे, राधाकिशन शिंदे, शिवाजी खरात, विलास खंडेलवाल आदींची उपस्थिती होती.