शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू
2
महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!
3
लोकसभा अध्यक्षपद भाजपकडेच?; 'या' महिला नेत्याचे नाव स्पर्धेत आघाडीवर
4
...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा
5
आजचा अग्रलेख: संशयकल्लोळ..!
6
गणपती स्पेशल जादा गाड्या सोडा; अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी
7
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

परभणी: सुटीच्या दिवशीही अधिकारी कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:25 PM

रविवारी सायंकाळी आचारसंहिता जाहीर होण्याची कुणकुण लागताच तातडीने जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्युटीवर बोलावून प्रलंबित कामांना मंजुरी देण्याची घाई गडबड केली जात असल्याचे चित्र रविवारी पहावयास मिळाले. सर्वच शासकीय कार्यालयात अधिकारी- कर्मचाऱ्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती पाहावयास मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रविवारी सायंकाळी आचारसंहिता जाहीर होण्याची कुणकुण लागताच तातडीने जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्युटीवर बोलावून प्रलंबित कामांना मंजुरी देण्याची घाई गडबड केली जात असल्याचे चित्र रविवारी पहावयास मिळाले. सर्वच शासकीय कार्यालयात अधिकारी- कर्मचाऱ्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती पाहावयास मिळाली.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आठवडाभरापासून वर्तविली जात होती. त्यामुळे मागील आठवड्यापासून शासकीय कार्यालयातील कामकाजाचा नूर बदललेला दिसून येत आहे. ८ मार्च रोजी आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज अधिकाºयांनी बांधला होता; परंतु, ८ मार्च रोजी या संदर्भात कुठलीही घोषणा झाली नाही. ९ मार्च रोजी दुसºया शनिवारची आणि १० मार्च रोजी रविवार असल्याने शासकीय कामकाजाला सुटी असते. परिणामी ११ मार्च रोजी आचारसंहिता जाहीर होईल, असे गृहित धरण्यात आले होते. मात्र रविवारी सकाळीच सोशल मीडियातून आचारसंहितेच्या संदर्भाने पोस्ट व्हायरल झाल्या. सायंकाळी ५ वाजता निवडणूक विभागाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याचे अधिकृत वृत्तही दुपारच्यावेळी दाखल झाले. त्यानंतर मात्र एकच धावपळ झाली.आचारसंहिता लागू झाल्यानंतर कामांना मंजुरी देता येणार नाही. परिणामी लाखो रुपयांची कामे ठप्प होतील. तसेच अनेक बिले अडकून पडली असल्याने महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने कार्यालयात दाखल झाले. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास या कार्यालयांचा फेरफटका मारला असता कामकाजाच्या दिवसांप्रमाणे रविवारी देखील कामकाज सुरु असल्याचे पाहावयास मिळाले.जिल्हाधिकारी पी. शिव शंकर हे देखील दुपारी कार्यालयात दाखल झाले. काही अधिकाºयांची बैठक त्यांनी घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे हे देखील कार्यालयात येऊन गेल्याची माहिती मिळाली.दरम्यान, दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभाग, त्याच शेजारी असलेल्या मानव विकास विभागात अधिकारी- कर्मचारी नियमित कामकाज करीत असल्याचे पहावयास मिळाले. जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे यांच्यासह बहुतांश कर्मचारी उपस्थित होते. तसेच याच कार्यालयातील गृहविभाग, लेखा विभाग, नगरपालिका प्रशासन विभाग, रोजगार हमी योजना विभागात आवश्यक असलेले कर्मचारी उपस्थित असल्याचे पहावयास मिळाले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्याच शेजारी असलेल्या तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी सूचिता शिंदे या स्वत: उपस्थित होत्या. तसेच या कार्यालयातील पुरवठा, महसूल या विभागांमध्ये कामकाज सुरु असल्याचे दिसून आले. प्रलंबित कामांना मंजुरी देण्यासाठी फाईलिंग करणे, कागदपत्रांची जुळवाजुळव करणे ही कामे सुरु होती. तसेच पंचायत समिती, महापालिका प्रशासकीय इमारतीतील काही कार्यालयांमध्येही कामकाज नियमितपणे सुरु असल्याचे पहावयास मिळाले.आचारसंहिता लागताच जिल्हाधिकाºयांनी बैठकीतून दिल्या सूचना४लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सहा महिन्यांपासून प्रशासनाने तयारी सुरु केली होती. मतदारांची नोंदणी करणे, मतदान जनजागृती या कार्यक्रमांबरोबरच जिल्ह्यातील मतदान केंद्रांची सुसज्जता, मतदान यंत्रांची उपलब्धता आदी कामे करण्यात आली. रविवारी सायंकाळी ५ वाजेपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सायंकाळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि जिल्हा निवडणूक कक्षातील अधिकाºयांची बैठक घेतली. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाºयांना दिल्या. सोमवारी सकाळपासूनच अधिकाºयांच्या बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता सर्व विभागप्रमुखांची बैठक होणार असून, दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील राजकीय पदाधिकाºयांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली. दरम्यान, प्रशासनाने निवडणुकीची संपूर्ण तयारी केली असून, आवश्यक कर्मचाºयांची नियुक्तीही केली आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांनी दिली.जिल्हा परिषदेत पदाधिकाºयांचाही वावर४एरव्ही सुटीच्या दिवशी ओस असणारी जिल्हा परिषद १० मार्च रोजी मात्र अधिकारी- कर्मचारी आणि पदाधिकाºयांच्या उपस्थितीने गजबजून गेल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणातच मोठ्या प्रमाणात वाहने लागली होती. जिल्हा परिषदेतील कृषी विभाग, सामान्य प्रशासन विभाग, लघु पाटबंधारे विभाग, वित्त विभाग, शिक्षण विभाग या विभागांमध्ये कर्मचारी काम करीत असल्याचे पहावयास मिळाले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात चांगलीच गर्दी असल्याचे दिसून आले. कर्मचारी फाईलींचा गठ्ठा घेऊन तपासणीचे काम करीत होते. तर प्रलंबित कामांना मंजुरीही दिली जात असल्याचे दिसून आले. याच विभागाच्या शेजारी असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा कक्षही सुरु असल्याचे पहावयास मिळाले.सा.बां. विभागातही कामकाज४शनिवार बाजारातील सार्वजनिक बांधकाम विभागातही रविवारी अधिकारी- कर्मचाºयांची उपस्थिती दिसून आली. सुटीच्या दिवशीही कामकाज सुरु होते. बांधकाम विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील पोर्चमध्ये कार्यकारी अभियंत्यांचे वाहन उभे असल्याचे पहावयास मिळाले. तसेच कार्यकारी अभियंता पार्डीकर, उप कार्यकारी अभियंत्यांचे कक्ष सुरु होते. या कक्षासमोर नागरिकांची गर्दीही दिसून आली. त्याचप्रमाणे या कार्यालयातील तांत्रिक विभाग, लेखा विभाग, आस्थापना विभागात कर्मचारी कामकाज करीत असल्याचे पहावयास मिळाले.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक