लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महानगरपालिकेच्या हद्दीतील ११ हजार लाभार्थ्यांच्या जागेचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून हे काम केले जात असून, ही एजन्सी कागदपत्रांची तपासणी करून अहवाल महापालिकेला देणार आहे़सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत परभणी शहरात प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे़ या योजनेसाठी शहरातील लाभार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत़ या अर्जांचा डाटा महापालिकेकडे उपलब्ध असून, अर्जदारांच्या जागेची तसेच कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी महापालिकेने एका एजन्सीची नियुक्ती केली आहे़या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे़ आतापर्यंत मनपाकडे सुमारे ११ हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे़ या लाभार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे़ सर्वेक्षणानंतर प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी दिली जाणार आहे़शासकीय जागेवरही परवानगी४प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे घर सद्यस्थितीत शासकीय जमिनीवर आहे़ अशा लाभार्थ्यांनाही घरकुल योजनेचा लाभ दिला जावा, असा शासन आदेश आहे़ महापालिकेनेही सर्वसाधारण सभेत या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याचे निश्चित केले आहे़ त्यानुसार जायकवाडी कालव्याच्या जमिनीवर तसेच महापालिकेच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ दिला जाणार आहे़ त्याच अनुषंगाने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे़लाभार्थ्यांनी मोबदला देऊ नये४पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जमिनीची अट शिथिल करण्यात आली आहे़ तसा ठरावही मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला असून, महापालिकेने वैयक्तिक एजन्सीमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे़४हे सर्वेक्षण पूर्णत: मोफत असून, लाभार्थ्यांनी कोणालाही मोबदला देऊ नये व सर्वेक्षणाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे़
परभणी महानगरपालिका :११ हजार लाभार्थ्यांच्या जागेचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:09 IST