शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी मनपा निवडणूक: पहिल्या दोन तासांत ९.१० टक्के मतदान, दुपारनंतर मतदारांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:49 IST

सकाळी थंडीचा कडाका असतानाही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या.

परभणी: परभणी शहर महानगरपालिकेच्या ६५ जागांसाठी आज गुरुवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासांच्या सत्रात (सकाळी ९:३० पर्यंत) शहरात सरासरी ९.१० टक्के इतके मतदान नोंदवले गेले आहे. एकूण २ लाख ६१ हजार मतदारांपैकी २३ हजार ७८१ मतदारांनी आपला हक्क बजावला असून, दुपारनंतर हा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

कुठे उत्साह, कुठे तांत्रिक बिघाड सकाळी थंडीचा कडाका असतानाही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, प्रभाग क्रमांक ४ मधील बूथ क्रमांक १५ आणि प्रभाग १० मधील बूथ क्रमांक १ येथील ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड (एरर) निर्माण झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती. भारतीय बाल विद्या मंदिर केंद्रावरील मशीन वारंवार बंद पडत असल्याने मतदारांचा खोळंबा झाला. प्रशासनाने तातडीने बॅलेट युनिट बदलून प्रक्रिया सुरळीत केली.

मतदान केंद्र शोधताना कसरत शिवाजी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये १२ वेगवेगळे बूथ असल्यामुळे मतदारांना आपली खोली शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अनेक मतदारांची नावे जुन्या केंद्रावरून नवीन केंद्रावर हलवण्यात आल्याने मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रशासनाकडून मदतीसाठी कर्मचारी तैनात असले, तरी केंद्रांची माहिती मिळवण्यासाठी मतदारांना वणवण करावी लागली.

झोननिहाय आकडेवारी

प्रभाग १०, ११, १३: १०.२२ टक्के मतदान (सर्वाधिक)

प्रभाग ८, ९, १४: ९.१४ टक्के मतदान

प्रभाग ३, ४, ५, ६: ७.८८ टक्के मतदान

प्रभाग १२, १५, १६: ७.८३ टक्के मतदान

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Municipal Election: Slow Start, Technical Glitches, Voter Confusion

Web Summary : Parbhani municipal elections saw a slow start with 9.10% turnout in the first two hours. Technical issues with EVMs caused delays. Voters faced difficulties locating booths and name discrepancies, leading to confusion despite administrative assistance.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक २०२६