शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

परभणी : ६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सव्वा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:14 IST

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्हा बँकेतील ६ हजार ६३ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार या प्रमाणे १ कोटी २१ लाख २६ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. इतर राष्ट्रीयकृत बँकांमधील खात्यांमध्येही सदरील रक्कम जमा झाली असली तरी त्याचा अहवाल प्रशासनाकडे अद्याप आलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्हा बँकेतील ६ हजार ६३ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार या प्रमाणे १ कोटी २१ लाख २६ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. इतर राष्ट्रीयकृत बँकांमधील खात्यांमध्येही सदरील रक्कम जमा झाली असली तरी त्याचा अहवाल प्रशासनाकडे अद्याप आलेला नाही.केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष ६ हजार रुपये वार्षिक अर्थसहाय्य तीन टप्प्यात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने २ हजार रुपयांचा पहिला हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंतर्गत खाते असलेल्या ६ हजार ६३ शेतकऱ्यांच्या खात्यावर २६ फेब्रुवारीपर्यंत १ कोटी २१ लाख ६ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.बँकेच्या वतीने खाते क्रमांकाची पडताळणी झाल्यानंतर आणखी पात्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. जिल्हा बँकेची ही स्थिती असताना अन्य राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांमधील शेतकºयांच्या खात्यावर देखील अर्थसहाय्याची ही रक्कम जमा झाली आहे; परंतु, सदरील शेतकºयांनी दिलेल्या बँक शाखा व खातेनिहाय रक्कम जमा करण्यात आली असल्याने त्याची एकत्रित माहिती मंगळवारपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाली नव्हती. ही माहिती जमा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. विशेष म्हणजे राज्यभर या संदर्भातील काम वेगाने सुरु असून या कामात महसूल, सहकार व बँक प्रशासन गुंतले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीकोनातून युद्धपताळीवर हे काम सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.१ लाख ६७ हजार शेतकरी कुटुंबांची नोंदणी४प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६७ हजार पात्र शेतकरी कुटुंबांची नोंदणी करण्यात आली असून या संदर्भातील यादी एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ८४८ गावांमध्ये ८ अ प्रमाणे खातेदार शेतकºयांची ४ लाख ४८ हजार २०१ अशी संख्या असून त्यातील १ लाख ७१ हजार ४७ कुटुंब पात्र ठरले आहेत. पात्र शेतकºयांपैकी तब्बल १ लाख ६७ हजार शेतकºयांची नावे अपलोड झाल्याने जिल्हा प्रशासन वेगाने १०० टक्के उद्दिष्टपूर्तीच्या जवळ पोहचले आहे.‘रक्कम कर्ज खात्यात जमा करु नये’४प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांना शासनाच्या वतीने अर्थसहाय्य योजनेंंतर्गत देण्यात येणारी रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांनी सभासद शेतकºयांच्या कर्ज खात्यात जमा करुन घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने सर्व बॅकांना दिले आहेत. तशा सूचना केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने २८ फेब्रुवारी रोजी नाबार्ड व सर्व राज्यांच्या सहकार विभागातील अधिकाºयांसमवेत व्हिडिओ कॉन्स्फसरिंगमध्ये देण्यात आल्या असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही या संदर्भातील आदेशात नमुद करण्यात आले आहे.४५ लाभार्थ्यांची खाती जुळेनात४जिल्हा बँकेतील ४५ लाभार्थ्यांनी त्यांच्या खात्यासंदर्भातील माहिती व्यवस्थित दिली नसल्याने त्यांचे खाते जुळत नाहीत. त्यामुळे सदरील खात्यावर आलेली रक्कम तुर्त ब्लॉक करण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या खातेक्रमांकाची पडताळणी झाल्यानंतर सदरील रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँक