शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

परभणी : भाजपाची सदस्य नोंदणी; काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:19 IST

विधानसभा निवडणुकीला आणखी जवळपास तीन महिन्यांचा कालावधी असताना राजकीय पक्षांकडून या संदर्भातील तयारी सुरु करण्यात आली असून भारतीय जनता पार्टीने परभणी शहरात सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे. तर काँग्रेसने परभणी विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांच्या अर्ज मागणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: विधानसभा निवडणुकीला आणखी जवळपास तीन महिन्यांचा कालावधी असताना राजकीय पक्षांकडून या संदर्भातील तयारी सुरु करण्यात आली असून भारतीय जनता पार्टीने परभणी शहरात सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे. तर काँग्रेसने परभणी विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांच्या अर्ज मागणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.आॅक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार असून सप्टेंबरमध्ये यासाठीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये यासाठीची तयारी सुरु झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी परभणी शहरात पक्षाच्या सदस्य नोंदणीस सुरुवात करण्यात आली. यानिमित्त शिवाजी चौक येथे झालेल्या कार्यक्रमास महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सदस्य नोंदणीची आधुनिक पद्धतही सांगण्यात आली. यावेळी सदस्य नोंदणी प्रमुख संजय शेळके, प्रमोद वाकोडकर, मोहन कुलकर्णी, नगरसेविका मंगलाताई मुद्गलकर, मधुकर गव्हाणे, रितेश जैन, सुनील देशमुख, संजय रिझवानी, नितीन वट्टमवार, प्रशांत पार्डीकर, डी.एस. कदम, अशोक सेलगावकर, अन्नपूर्वे, घुगे, दिनेश नरवाडकर, व्यंकट डहाळे, देशपांडे, भीमराव वायवळ, भालचंद्र गोरे, विजय गायकवाड, सुधीर कांबळे, संजय कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. यावेळी जनसंघाचे संस्थापक डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. नवीन सदस्यांना वृक्ष भेट दिली.दरम्यान, शिवसेनेनेही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु केला आहे. शुक्रवारी शहरातील शंकरनगर भागात यानिमित्त कार्यक्रम घेण्यात आल्यानंतर शनिवारी प्रभाग क्रमांक १५ मधील पवनसूतनगर येथे हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील, सहसंपर्क डॉ.विवेक नावंदर, नंदू पाटील यांनी उपस्थित नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते.वरपूडकर यांचा पाथरीसाठी अर्जपरभणी : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी पाथरी मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. तसा शनिवारी त्यांनी रितसर अर्ज दाखल केला. परभणी विधानसभा मतदारसंघातून १४ जणांनी उमेदवारी मागितली. त्यात माजी आ.सुरेश देशमुख, तुकाराम रेंगे, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, उपमहापौर माजूलाला, भगवानराव वाघमारे, गणेश देशमुख, रविराज देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बाळासाहेब देशमुख, विशाल बुधवंत, अ‍ॅड.मुजाहेद खान, सुनील देशमुख, सचिन अंबिलवादे, मलेका गफार यांचा समावेश आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीBJPभाजपाcongressकाँग्रेस