एलबीटी विरोधात परभणीच्या व्यापा-यांनी बाजारपेठेत पाळला कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 15:37 IST2017-12-14T15:34:16+5:302017-12-14T15:37:20+5:30
महानगरपालिका करीत असलेल्या अन्यायकारक एलबीटी कराच्या विरोधात गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत परभणी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन मनपाचा निषेध नोंदविण्यात आला.

एलबीटी विरोधात परभणीच्या व्यापा-यांनी बाजारपेठेत पाळला कडकडीत बंद
परभणी : महानगरपालिका करीत असलेल्या अन्यायकारक एलबीटी कराच्या विरोधात गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत परभणी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन मनपाचा निषेध नोंदविण्यात आला.
महापालिकेने व्यापाऱ्यांकडून जाचक पद्धतीने एलबीटी थकबाकी वसूल केली जात असल्याचा आरोप करीत येथील व्यापाऱ्यांनी शिवाजी चौक येथे ८ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आंदोलनाची दखल न घेता बुधवारी मनपाने न्यायालयाचा स्थगिती आदेश न मानता एका व्यापाऱ्यांकडून थकबाकीपोटी रक्कम वसूल केली. त्यामुळे सर्वच व्यापारी संतप्त झाले आहेत.महापालिकेच्या दांडेलशाहीच्या विरोधात गुरुवारपासून दररोज दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे व्यापारी महासंघाने बुधवारी रात्रीच जाहीर केले होते. आज बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून व्यापाऱ्यांनी मनपाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. शिवाजी चौकातील धरणे आंदोलनस्थळी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.