शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

परभणी : गंगाखेडमध्ये मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:40 IST

शहर व परिसरातील मुख्य रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसह पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ आगामी गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी गणेश भक्तांतून केली जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): शहर व परिसरातील मुख्य रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसह पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ आगामी गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी गणेश भक्तांतून केली जात आहे़शहरातील अंतर्गत रस्त्यासह शहराबाहेर जाणाºया मुख्य मार्गावरील खड्ड्यांच्या रस्त्यावरून वाहने चालविताना कराव्या लागत असलेल्या कसरतीमुळे वाहनधारक व पादचारी चांगलेच त्रस्त झाले आहेत़ आगामी श्रीगणेशोत्सवापूर्वी विसर्जन मार्गावरील रस्त्यावर असलेले खड्डे बुजवून श्री गणेश मूर्तींचा प्रवास सुखकर करावा, अशी माफक अपेक्षा गणेश भक्तांतून केली जात आहे़गंगाखेड शहरातील कोद्री रोड ते संत जनाबाई मंदिरमार्गे गोदातट, दत्त मंदिर ते बसस्थानक मार्गे दिलकश चौक, परळी नाका ते डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे बसस्थानक, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर नगर ते तारुमोहल्ला, मराठा चित्रमंदिर, जुने पोस्ट कार्यालय, सराफ लेन, भगवती चौक, वेताळ गल्ली या शहरांतर्गतच्या प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्ते व विसर्जन मार्गावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत़ त्याचबरोबर गंगाखेड ते परभणी, परळी, पालम, इसाद, राणीसावरगाव, कोद्रीकडे जाणाºया मुख्य रस्त्यासह ग्रामीण भागातील खळी, चिंचटाकळी, मैराळ सावंगी, गौंडगाव, पडेगाव, सुरळवाडी, महातपुरी, मसला, राणीसावरगाव, पिंपळदरी, नरळद, इरळद, धारासूर, सुनेगाव, सायाळा इ. ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे़ विविध अडचणींचा सामना करण्याबरोबरच थोडासाही पाऊस झाल्यास रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचते. अनेकवेळा या खड्ड्यांचा अंदाज लागत नाही व दर दिवशी लहान मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत़गणेशोत्सवात या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडू नयेत, यासाठी खड्डे बुजवून रस्त्याची झालेली वाताहत दूर करावी, अशी मागणी होत आहे़सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन४शहरातील रस्त्यांसह गणेश विसर्जन मार्गावरील रस्त्यांची झालेली दुरवस्था दूर करून गणेश विसर्जनाचा मार्ग सुखकर करावा, यासाठी नगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे वेळीच लक्ष द्यावे. गणेशोत्सवापूर्वी शहर व परिसरातील सर्वच रस्ते खड्डेमुक्त करावेत, अशी मागणी गणेश भक्तांतून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूक