परभणी : माधव शेजूळ, मनिषा वाघमारे यांचा नागरी सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:54 IST2018-03-11T23:54:01+5:302018-03-11T23:54:22+5:30
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक प्रा़डॉ.माधव शेजूळ आणि सहासी गिर्यारोहक प्रा़मनिषा वाघमारे यांचा रविवारी नागरी सत्कार करण्यात आला़ येथील अक्षदा मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यास सर्व क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती़ सत्कारापूर्वी सत्कारमूर्तींची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली़

परभणी : माधव शेजूळ, मनिषा वाघमारे यांचा नागरी सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक प्रा़डॉ.माधव शेजूळ आणि सहासी गिर्यारोहक प्रा़मनिषा वाघमारे यांचा रविवारी नागरी सत्कार करण्यात आला़ येथील अक्षदा मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यास सर्व क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती़ सत्कारापूर्वी सत्कारमूर्तींची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली़
सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खा़बंडू जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी क्रीडा उपसंचालक जनक टेकाळे, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, महापौर मीनाताई वरपूडकर, जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते, मनपाचे सभागृह नेते भगवान वाघमारे, स्थायी समितीचे सभापती गणेश देशमुख, भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, प्रा़किरण सोनटक्के, नगरसेवक सचिन अंबिलवादे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, अॅड़अशोक सोनी, प्रा़ प्रदीप देशमुख, प्रा़मनोज रेड्डी, प्रा़यु़डी़ इंगळे, डॉ़राजगोपाल कालानी, केशव दुधाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ मान्यवरांच्या हस्ते प्रा़डॉ़शेजूळ, प्रा़मनिषा वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला़ शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मंगल पांडे यांनी प्रास्ताविक केले़
अध्यक्षीय समारोपात खेळ व खेळाडुंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन खा़ बंडू जाधव यांनी दिले़ प्रा़डॉ़ सुनिल मोडक यांनी सूत्रसंचालन केले़ सोहळा समितीचे समन्वयक रणजीत काकडे यांनी आभार मानले़ या सोहळ्यास क्रीडा प्रेमी नागरिक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते़ कार्यक्रमा दरम्यान शहरातील विविध संघटना, संस्थांनीही प्रा़ डॉ़ शेजूळ, प्रा़ मनिषा वाघमारे यांचा सत्कार केला़
तत्पूर्वी सकाळी शनिवार बाजार येथून सत्कारमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली़ ढोल पथक, झांज पथक, स्काऊट गाईडचे विद्यार्थी, लेझीम पथक या मिरवणुकीचे आकर्षण ठरले़ मिरवणुकीदरम्यान ठिक ठिकाणी सत्कारमूर्तीचे स्वागत करण्यात आले़