शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

परभणी : रासायनिक खतासाठी व्यापाऱ्यांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:27 AM

खरीप पेरणीच्या तोंडावर रासायनिक खतासाठी व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची लूट केली जात आहे. अनेक दुकानदारांकडे जुन्या एमआरपीचे खत शिल्लक असतानाही या खताची नवीन एमआरपी दराने सर्रास विक्री केली जात असल्याने शेतकºयांची फसवणूक केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): खरीप पेरणीच्या तोंडावर रासायनिक खतासाठी व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची लूट केली जात आहे. अनेक दुकानदारांकडे जुन्या एमआरपीचे खत शिल्लक असतानाही या खताची नवीन एमआरपी दराने सर्रास विक्री केली जात असल्याने शेतकºयांची फसवणूक केली जात आहे.गतवर्षी जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ९ पैकी ६ तालुके गंभीर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले. या यादीत पाथरी तालुक्याचाही समावेश आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांनी खरीप व रबी हंगामात पेरणी केली. त्या शेतकºयांच्या हाती काहीच लागले नाही. परिणामी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकºयांना पुन्हा उसणवारी व बँकांच्या दारात पेरणीसाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी उभे रहावे लागले. बँक प्रशासनाने पीक कर्ज वाटपात घेतलेला आखडता हात शेतकºयांना आर्थिक कोंडीत लोटणारा ठरत आहे. त्यामुळे उसणवारी करून शेतकºयांना बी बियाणे व खते खरेदी करावी लागत आहेत. त्यातच एप्रिल २०१९ पासून रासायनिक खताच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. एका बॅगच्या पाठीमागे साधारणपणे २०० पेक्षा अधिक किंमत वाढल्याचे दिसून येत आहे. पाथरी शहरात बी बियाणे, रासायनिक खते आणि किटकनाशकाची परवानाधारक ३५ ते ४० दुकाने आहेत. गतवर्षी मार्च अखेर जवळपास सर्वच दुकानदारांकडे जुन्या दरातील एमआरपी असलेल्या खताचा साठा शिल्लक होता. जुन्या किंमतीत असलेल्या खताचा साठा त्याच किंमतीत विक्री करणे अपेक्षित आहे; परंतु, शहरातील काही व्यापारी जुन्या किंमतीमधील खत नवीन एमआरपीमध्ये विक्री करीत आहेत. एका बॅगमध्ये २०० रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा भूर्दंड शेतकºयांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, दुकानदारांकडून शेतकºयांची होणारी फसवणूक कृषी विभाग उघड्या डोळ्याने पाहत आहे; परंतु, कारवाईसाठी पुढे येत नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.पावसाअभावी : पेरण्या खोळंबल्याच्मृगनक्षत्रात पाऊस पडला नाही. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील हादगाव, पाथरगव्हाण या भागात हलका पाऊस पडला. बाभळगाव पट्टा अद्यापही कोरडा पडला आहे. परिणामी पावसाअभावी पेरणी खोळंबली आहे. या आठवड्यात पाऊस झाला तर बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शेतकºयांची बाजारपेठेत मोठी गर्दी होणार आहे. या गर्दीचा फायदा व्यापारी घेऊ शकतात. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन जुन्या एमआरपीचा खत नवीन किंमतीत विकणाºयांवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.असे आहेत नवीन दर४१०-२६-२६ या खताची बॅग ११८० रुपयांना मिळत होती. ती आता १३६० रुपयांवर जाऊन पोहचली आहे. त्याच बरोबर १५-१५-१५ या प्रकारातील खत ९८० रुपयांना प्रती बॅग होती. आता नवीन दरानुसार १०७० रुपये शेतकºयांना एका बॅगसाठी मोजावे लागणार आहेत.४डीएपी नावाचा खत जुन्या दरामध्ये १२३० रुपयांना मिळत होता. तो आता १३७० रुपयांना विक्री होत आहे. १८-१८-१० हा खत ८४० रुपयांंना बाजारामध्ये उपलब्ध होता. तो आता १०२० रुपयांना मिळणार आहे. यामुळे दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.रासायनिक खताच्या किंमती यावर्षी वाढल्या आहेत. जुन्या दरातील शिल्लक असलेला खत त्याच एमआरपीमध्ये विक्री करणे आवश्यक आहे. मात्र जुन्या दरातील खत वाढीव एमआरपीमध्ये विक्री केल्याचे उघड झाल्यास संबंधित दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.-कुपटेकर, कृषी अधिकारी,पं.स. पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस