परभणी :सीओंच्या कक्षाला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:23 IST2018-01-30T00:22:51+5:302018-01-30T00:23:03+5:30
थकित पेंशन व डीएची वाढ द्यावी, या मागणीसाठी संतप्त सेवानिवृत्तांनी २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पालिकेतील मुख्याधिकाºयांच्या कक्षाला कुलूप ठोकले. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर पाच तासांनी हे कुलूप उघडण्यात आले.

परभणी :सीओंच्या कक्षाला ठोकले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : थकित पेंशन व डीएची वाढ द्यावी, या मागणीसाठी संतप्त सेवानिवृत्तांनी २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पालिकेतील मुख्याधिकाºयांच्या कक्षाला कुलूप ठोकले. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर पाच तासांनी हे कुलूप उघडण्यात आले.
पूर्णा नगरपालिकेच्या विविध विभागातून सेवानिवृत्त झालेल्या ५० हून अधिक कर्मचाºयांना मागील अनेक महिन्यांपासून सेवानिवृत्त वेतन मिळाले नाही. त्यामुळे या कर्मचारी कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. वयोवृद्ध सेवानिवृत्तांना वैद्यकीय खर्चासाठीही अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच सेवानिवृत्ती वेतनाबरोबरच डीएतील वाढीची रक्कमही या कर्मचाºयांना मिळाली नाही. त्यामुळे २४ जानेवारीपासून ५० सेवानिवृत्त कर्मचाºयांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. पालिका प्रशासनाने या आंदोलनाची अद्यापपर्यंत दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी सोमवारी सकाळी पूर्णा पालिकेच्या मुख्याधिकाºयांच्या कक्षाला कुलूप ठोकले. या प्रकारानंतर फौजदार गणेश राठोड घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मोजकेच अधिकारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनातील अधिकाºयांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांशी चर्चा केली. या चर्चेनंतर सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिल्याने पाच तासानंतर कुलूप उघडण्यात आले. या आंदोलनात एम.जे.नगरे, बी.बी.जैन, पाईकराव, एम.एस. आरे, एम.डी. जोशी, श्रीराम कदम, लक्ष्मीबाई गवळी, लक्ष्मीबाई वावळे, शोभाबाई गायकवाड, लक्ष्मण कदम आदींनी सहभाग नोंदविला.