शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

परभणी : चाटोरीत पकडली स्कूलबॅगमध्ये दारु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:28 PM

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : चाटोरी येथील यात्रेत विक्री करण्याच्या उद्देशाने स्कूलबॅगमध्ये लपवून ठेवलेली साडे सहा हजार रुपयांची दारु ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चाटोरी येथील यात्रेत विक्री करण्याच्या उद्देशाने स्कूलबॅगमध्ये लपवून ठेवलेली साडे सहा हजार रुपयांची दारु पोलिसांनी १४ जानेवारी रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास छापा टाकून पकडली.जिल्ह्यात अवैध दारु विक्री विरुद्ध पोलिसांनी मोहीम सुरु केली आहे. चाटोरी येथे यात्रा सुरु असून या यात्रेत दारु विक्री करण्याच्या उद्देशाने दारुचा साठा केला जात आहे. या संदर्भात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला माहिती मिळाली. त्यावरुन या पथकाने चाटोरी परिसरातील जय महाराष्ट्र ढाब्याच्या शेजारील मोकळ्या जागेत छापा टाकला. त्यावेळी देशी आणि विदेशी दारुच्या ३० बाटल्या स्कूलबॅगमध्ये लपवून ठेवल्याचे आढळले. या प्रकरणी आरोपी गजानन माणिकराव किरडे (२२) याच्याविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दारुच्या ३० बाटल्या आणि नगदी २ हजार रुपये असा ६ हजार ४१६ रुपयांचा माल जप्त केला. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या आदेशावरुन सहायक पोलीस निरिक्षक एस.एम.देवकते, सुरेश डोंगरे, संजय शेळके, किशोर चव्हाण, सय्यद मोबीन, रामकिशन काळे, सय्यद मोईन आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदी