शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

परभणी: कडबा शेकडा चार हजारांवर पोहचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:09 IST

जिल्ह्यातील दुष्काळ दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करीत असून यावर्षी माणसांबरोबरच जनावरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जिल्ह्यात ओला चारा संपल्याने कडब्याला मागणी वाढली असून कडब्याचे भाव चार हजार रुपये शेकडा झाले आहेत. परिणामी महागामोलाचा चारा घेऊन जनावरे जगवावी लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील दुष्काळ दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करीत असून यावर्षी माणसांबरोबरच जनावरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जिल्ह्यात ओला चारा संपल्याने कडब्याला मागणी वाढली असून कडब्याचे भाव चार हजार रुपये शेकडा झाले आहेत. परिणामी महागामोलाचा चारा घेऊन जनावरे जगवावी लागत आहेत.यंदा पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस झाला आणि विशेष म्हणजे परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवल्या. सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो; परंतु, यावर्षी पावसाअभावी नोव्हेंबरपासूनच जिल्हावासियांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ओला चारा शिल्लक नसल्याने यावर्षी जनावरांची उपासमार होत आहे. गावोगावचे बाजार जनावरांनी फुलत असले तरी या बाजारपेठेत व्यापारी अधिक आणि ग्राहक कमी अशी परिस्थिती मागील दोन महिन्यांपासून पहावयास मिळत आहे.गुरुवारी जिल्ह्याचा जनावरांचा बाजार भरतो. या बाजारपेठेत जनावरांबरोबरच चाऱ्याचीही मोठ्या प्रमाणात विक्री होते. येथील खंडोबा बाजार भागात भरणाºया जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात चारा विक्रीसाठी आल्याचे पहावयास मिळाले. दररोज या ठिकाणी जिल्ह्यातील विक्रेते चाºयाची विक्री करतात.कडबा, ओला चारा, ऊस, वाढे असे चाºयाचे प्रकार विक्रीसाठी दाखल झाले आहेत; परंतु, सर्वच चाºयाचे भाव जवळपास दुप्पटीने वाढले आहेत. त्यामुळे चारा उपलब्ध असला तरी जनावरांना देताना पशूपालकांना पैशांचाही ताळमेळ लावावा लागत आहे.कडबा सर्वसाधारणपणे १८०० ते २ हजार रुपये शेकडा या दराने विक्री होतो. मात्र बाजारपेठेत कडब्याचे भाव ३८०० ते ४ हजार रुपये शेकड्यापर्यंत पोहचले आहेत. परभणीच्या बाजारपेठेत जवळपास ५ हजार कडबा दररोज विक्रीसाठी येत असला तरी त्यातील केवळ १ हजार कडब्याचीच विक्री होत आहे. भाववाढीमुळे पशूपालक त्रस्त आहेत. कडब्याबरोबरच उसाचे कांडे २ हजार ६०० रुपये शेकडा या दराने विक्री होत आहे.उसाच्या कांड्यांचेही भाव सरासरी ६०० रुपयांनी वाढले आहेत. तसेच ५०० रुपये शेकडा दराने वाढ्यांची विक्री होत आहे. मक्याच्या हिरव्या पेंड्या येथील बाजारपेठेत विक्री होत असून २० रुपयांना एक पेंडी दिली जात आहे. मक्याचा ओला चारा उपलब्ध असला तरी पशूपालकांकडून या चाºयाला मागणी कमी आहे. एकंदर जिल्ह्यामध्ये चारा विक्रीसाठी दाखल होत असला तरी भाववाढ झाल्याने हा चारा खरेदी करण्यासाठी पशूपालक आखडता हात घेत आहेत.आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक टंचाईचा सामना करणारे शेतकरी चाºयाचे भाव दुप्पटीने वाढल्याने आणखीच अडचणीत सापडले आहेत. दिवसभरामध्ये २५ टक्के चाºयाचीही विक्री होत नसल्याचेही व्यावसायिकांनी सांगितले.जनावरांची विक्रीही मंदावलीबाजारात नांदेड, मानवत, सेलू, परतूर, गंगाखेड, वसमत, हिंगोली आदी भागातून व्यापारी जनावरांच्या विक्रीसाठी येतात. प्रत्येक बाजाराच्या दिवशी ५०० ते ६०० जनावरे विक्रीसाठी दाखल होत आहेत. दोन महिन्यांपासून बाजारपेठेतील जनावरांची संख्या दुप्टीने वाढली आहे; परंतु, ग्राहक नसल्याने विक्री मंदावली आहे. त्यामुळे जनावरांचे भावही कमी झाले आहेत. गुरुवारी या बाजारपेठेत बैल, म्हैस, गोºहे, शेळ्या अशी जनावरे विक्रीसाठी आल्याचे पहावयास मिळाले.या बाजारपेठेत १५ वर्षांपासून व्यवसाय करीत आहे. यावर्षी चारा टंचाईमुळे भाव वाढले आहेत. कडबा २८०० ते ३ हजार रुपये शेकडा विक्री होत आहे; परंतु, उसाचे वाढे बाजारपेठेत दाखल झाल्यामुळे कडब्याला मागणी नाही. अशीच परिस्थिती राहिली तर कडबा, ओला चारा आणि वाढ्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.-शेरखान अनवर खान, विक्रेताजनावरांच्या बाजारात ५०० ते ६०० जनावरे विक्रीसाठी येत असली तरी दाखले मात्र २०० ते २५० एवढेच होत आहेत. खरेदीदारांची संख्या रोडावल्याने दाखले कमी होत आहेत.-सय्यद हारुण स. मुसा, बिल कलेक्टर, मनपा

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ