परभणी :तलाठ्यांनाही बायोमॅट्रीक हजेरी केली बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:36 IST2017-12-20T00:35:52+5:302017-12-20T00:36:01+5:30
तहसील कार्यालयांतर्गत काम करणाºया सर्व मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनाही आधार बेसड् बायोमॅट्रीक उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.

परभणी :तलाठ्यांनाही बायोमॅट्रीक हजेरी केली बंधनकारक
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तहसील कार्यालयांतर्गत काम करणाºया सर्व मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनाही आधार बेसड् बायोमॅट्रीक उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सर्व अधिकारी, कर्मचाºयांना आधार बेसड् बायोमॅट्रिक उपस्थिती लागू केली आहे. मागील एक महिन्यापासून आधार बेसड् उपस्थिती नोंदविली जात आहे. दरम्यान, या अंतर्गत जिल्हाधिकाºयांनी तहसीलदारांना पत्र पाठविले असून तहसील कार्यालयातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठ्यांचे रजिस्ट्रेशन दोन दिवसांत पूर्ण करावे आणि या कर्मचाºयांनाही आधार बेसड् बायोमॅट्रिक उपस्थिती नोंदविण्याचे सूचित करावे, असे निर्देश दिले आहेत.