शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

परभणी : रिमझिम पावसाने मान्सूनकडून उंचावल्या आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 23:25 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात दोन आठवड्यांच्या विलंबाने २२ जून रोजी जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला असून, मध्यम स्वरुपाच्या या पावसाने बळीराजाच्या आशा उंचावल्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या पावसाळ्यात दोन आठवड्यांच्या विलंबाने २२ जून रोजी जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला असून, मध्यम स्वरुपाच्या या पावसाने बळीराजाच्या आशा उंचावल्या आहेत़८ जून रोजी मृग नक्षत्रानंतर प्रत्यक्ष पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी मौसमी पाऊस होत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या़ पाऊस लांबल्याने जिल्हाभरात चिंतेचे वातावरण होते़ तसेच मागील सहा महिन्यांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसणाºया जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमधील पाण्याची समस्या आणखीच गंभीर होत चालली होती़ त्यामुळे दुष्काळाने ग्रासलेल्या येथील नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागली होती़२२ जून रोजी पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली़ काही भागात मध्यमस्वरुपाचा तर काही भागात रिमझिम पाऊस बरसल्याने वातावरणात मोठा बदल झाला आहे़परभणी तालुक्यात मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली़ हा पाऊस पेरणी योग्य नसला तरी शेतकरी सुखावला गेला आहे़ रात्री साधारणत: एक ते दीड तास पाऊस झाला़ पहाटेही पावसाची रिमझिम सुरू होती़ पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे़ पाथरी तालुक्यातही पहाटे २ वाजेपासूनच रिमझिम, मध्यमस्वरुपाचा पाऊस होत आहे़ गंगाखेड, मानवत, जिंतूर, सोनपेठ, पालम, सेलू या तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली़ एकंदर पावसामुळे शेतकरी सुखावले असून, काही भागात धूळ पेरण्यांना सुरुवात झाली आहे़ कापसाची लागवड केली जात आहे़ शनिवारी जिल्हाभरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते़ परभणी शहर व परिसरात सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही़ त्यामुळे अनेक महिन्यानंतर पावसाळी वातावरण तयार झाले होते़ परभणी शहर व परिसरात शनिवारी पहाटे झालेल्या या पावसात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली़ रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शहरातील दत्तनगर, कारेगाव रोड भागातील वीज पुरवठा खंडित झाला़ रात्रभर हा वीज पुरवठा सुरळीत झाला नाही़ त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला़काही भागात पेरण्याशनिवारी पहाटे झालेला पाऊस पेरणीयोग्य नसला तरी काही शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत़ विशेषत: सेलू, पाथरी, जिंतूर, मानवत या तालुक्यांमध्ये शेतकºयांनी पेरण्या सुरू केल्या आहेत़ त्यात कापसाची लागवड केली जात आहे़ जिल्ह्यामध्ये यापूर्वीही अनेक शेतकºयांनी धूळ पेरणी केलेली आहे़ मागील वर्षी धूळ पेरणी केलेल्या शेतकºयांना कापसाचा उतारा वाढवून मिळाला होता़ मागील वर्षीचा हा अनुभव लक्षात घेऊन अनेक भागात शेतकºयांनी धूळ पेरणीचा धोका पत्करला आहे़ विशेष म्हणजे कृषी विभागातील अधिकारी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा, असा सल्ला देत असतानाही शेतकरी मात्र घाई करीत असल्याचे दिसत आहे़ अजूनही शेतकºयांनी घाई करू नये़ चांगला दमदार पाऊस झाल्यानंतरच पेरण्यांना सुरुवात करावी, असे आवाहन केले जात आहे़ दरम्यान, शनिवारी पहाटे झालेल्या पावसानंतर परभणी शहरातील मोंढा बाजारपेठेत प्रथमच शेतकºयांची गर्दी दिसून आली़ कृषी निविष्टांच्या दुकानांवर खत, बियाणे आणि शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी दिवसभर शेतकºयांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले़ एकंदर या पावसाने शेतकºयांच्या आशा उंचावल्या आहेत़सरासरी ६़८१ मिमी पाऊसशनिवारी पहाटे ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६़८१ मिमी पाऊस झाला आहे़ जिंतूर तालुक्यात सर्वाधिक १९़६७ मिमी, तर सेलू तालुक्यात ११ मिमी, पाथरी ९ मिमी, मानवत ६ मिमी, सोनपेठ ५ मिमी, परभणी ४़८८ मिमी, पूर्णा ४़२० मिमी आणि गंगाखेड तालुक्यात १़५० मिमी पावसाची नोंद झाली आहे़पूर्णा तालुक्यात जोरदार हजेरीतालुक्यातील पाचही मंडळात २१ जून रोजी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली असून, २२ जून रोजीही रिमझिम पाऊस सुरू होता़ शुक्रवारी साधारणत: रात्री ११़३० वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली़ अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस बरसल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला़ पहाटे ८ वाजेपर्यंत आधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या़ तालुक्यात सरासरी २१ मिमी पाऊस झाला आहे़ त्यात पूर्णा मंडळामध्ये ३ मिमी, चुडावा २ मिमी, कात्नेश्वर ४ मिमी, लिमला २ मिमी तर ताडकळस मंडळात १० मिमी पावसाची नोंद झाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशल