Parbhani: Honor of 3 police officers was maintained | परभणी : ६५० पोलीस पाटलांचे मानधन रखडले

परभणी : ६५० पोलीस पाटलांचे मानधन रखडले

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील सुमारे साडेसहाशे पोलीस पाटलांचे मानधन तीन महिन्यांपासून थकल्याने सणा-सुदीच्या काळात या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हे मानधन त्वरित वाटप करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. बजेट उपलब्ध नसल्याने मानधन थकल्याची माहिती मिळाली आहे.
ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांतील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात. पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारीत असणाºया या पोलीस पाटलांची नियुक्ती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे.
या पोलीस पाटलांना ६ हजार ५०० रुपये प्रति महिना मानधन दिले जाते. मात्र जून महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याने पोलीस पाटील कुटुंबिय आर्थिक पेचात सापडले आहेत. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे; परंतु हातात पैसा नसल्याने पोलीस पाटलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी मंगळवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले असून, मानधन त्वरित वितरित करण्याची मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात मतदानासाठी बुथवर हजर राहण्यासाठी दोन दिवसांचे नियुक्तीपत्र द्यावे, अशी मागणी पोलीस पाटलांनी केली आहे. इतर जिल्ह्यात पोलीस पाटलांना नियुक्तीपत्र वाटप केले जात असताना परभणीत मात्र अद्याप एकाही कर्मचाºयास हे नियुक्तीपत्र मिळाले नाही.
प्रकाश कहाते, तुकाराम रेंगे, बाळासाहेब काळे, माणिक जाधव, आबासाहेब देशमुख, सुरेश देशमुख, ज्ञानोबा मोहिते, माणिक भोसले, गजानन सुरवसे, लहू माने, गणेशराव सामाले, श्रीराम जाधव, रामजी मोरे, दिलीप शिंदे, राम भारती, अशोक गोरे, जिजाभाऊ मगर, विष्णू घुले आदींची निवेदनावर नावे आहेत.
महिन्याकाठी १० लाख रुपयांचा खर्च
४जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे मानधन अदा करण्यासाठी प्रत्येक महिन्याला १० लाख रुपयांचा खर्च होतो.
४मात्र जुलै महिन्यापासून मानधनापोटी बजेट उपलब्ध झाले नसल्याने पोलीस पाटील कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये केलेल्या कामाचा भत्ताही अद्याप मिळाला नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले.

Web Title: Parbhani: Honor of 3 police officers was maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.