शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

परभणी : औरंगाबाद-नांदेड महामार्गावरील वाहतूक ५ तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:58 PM

औरंगाबाद-नांदेड महामार्गावरील गीते पिंप्री गावाजवळील पुलावर एक कंटेनर आडवा झाल्याने या मार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प झाली होती़ ही घटना १४ आॅक्टोबर रोजी रात्री ११़४५ वाजेच्या सुमारास घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगावफाटा (परभणी) : औरंगाबाद-नांदेड महामार्गावरील गीते पिंप्री गावाजवळील पुलावर एक कंटेनर आडवा झाल्याने या मार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प झाली होती़ ही घटना १४ आॅक्टोबर रोजी रात्री ११़४५ वाजेच्या सुमारास घडली़नांदेडहून जालन्याकडे जाणारा कंटेनर (क्रमांक आरजे ४९ जीए-०६५५) १४ आॅक्टोबर रोजी रात्री ११़४५ वाजेच्या सुमारास गीते पिंप्री गावाजवळील पुलावर आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला़ त्यामुळे हा कंटेनर पुलाच्या कठड्याला आदळून रस्त्यावर मधोमध आडवा झाला़ या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही़ मात्र कंटेनरच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे़अपघाताची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी राऊत, महामार्गचे सहायक पोलीस निरीक्षक बिभीषण राठोड, अशोक धस, विजय बायस हे घटनास्थळी दाखल झाले़ अपघातग्रस्त कंटेनर पुलाच्या मध्ये अडकल्याने या मार्गावरील वाहतूक ५ तास ठप्प झाली होती़ पोलिसांच्या तत्परतेने ही वाहतूक सुरळीत करण्यात आली़ या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीTrafficवाहतूक कोंडीAccidentअपघात