शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

रिक्त पदांच्या आजाराने ग्रासला परभणी आरोग्य विभाग; प्रभारींवरच चालतोय कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 5:18 PM

ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविताना या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देसंकट काळात कर्मचाऱ्यांनी दाखविली क्षमता

परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात एकही प्रमुख अधिकारी पूर्णवेळ नसल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवर कारभार चालवावा लागत आहे. या विभागाला रिक्त पदाच्या आजाराने ग्रासले असून, पदभरती करण्याच्या शासकीय उपचारांची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

जिल्हा परिषदे अंतर्गत येत असलेल्या आरोग्य विभागातून ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सांभाळली जाते. ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवा पुरविणाऱ्या या विभागात मात्र मागील अनेक वर्षांपासून पूर्णवेळ अधिकाऱ्यांचा वाणवा आहे. या विभागाचे प्रमुख पद असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी पद मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि सांख्यिकी अधिकारी ही महत्त्वाची पदेच रिक्त आहेत. या सर्व पदांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत चालविला जात आहे.

एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. या काळात नियमित आरोग्य सेवेबरोबरच कोरोनाच्या संकटाला रोखण्याचे काम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावे लागले. प्रभारी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त जबाबदारी सांभाळत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवण्याचे काम केले आहे. या काळात जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती अंजलीताई आणेराव यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना रिक्त पदांची बाब निदर्शनास आणून दिली. मात्र अद्यापही पदे भरण्यासंदर्भात कारवाई झाली नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आणखी सुरळीत करण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने रिक्त पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.

 वर्ग ३ ची ३४ टक्के पदे रिक्त आरोग्य विभागात वर्ग ३ ची ६५७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी तब्बल २२८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचे हे प्रमाण ३४ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेविका, वैद्यकीय पर्यवेक्षक आणि युनानी हकिम ही पदे रिक्त आहेत. अधिकाऱ्यांबरोबरच प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही क्षमतेच्या तुलनेत कमी असल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविताना या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

संकट काळात कर्मचाऱ्यांनी दाखविली क्षमताकोरोनाच्या संकटकाळात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मनुष्यबळ कमी असतानाही आपली क्षमता दाखवून दिली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात काम असतानाही या कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याची काळजी घेतली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या संकट काळामध्ये आपली क्षमता दाखवून दिली आहे.

आरोग्य विभागातील रिक्त पदे जिल्हा आरोग्य अधिकारी         १अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी      १ सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी      १जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी     १वैद्यकीय अधिकारी गट अ      १३प्रशासकीय अधिकारी          १सांख्यिकी अधिकारी         १जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी     १ आरोग्य सेवक          ४६आरोग्य सेविका                    १२५

टॅग्स :parabhaniपरभणीHealthआरोग्यdoctorडॉक्टर