शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

परभणी : आरोग्य, कृषी संलग्न व्यवसाय खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:23 PM

जिल्ह्यातील कृषी व या क्षेत्रावर आधारित इतर व्यवसाय, आरोग्य क्षेत्रातील व्यवसाय आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील व्यवसाय सुरु करण्याची मुभा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर मंगळवारी विविध आदेशान्वये दिली आहे. त्यामुळे एक महिन्यापासून ठप्प असलेली जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील कृषी व या क्षेत्रावर आधारित इतर व्यवसाय, आरोग्य क्षेत्रातील व्यवसाय आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील व्यवसाय सुरु करण्याची मुभा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर मंगळवारी विविध आदेशान्वये दिली आहे. त्यामुळे एक महिन्यापासून ठप्प असलेली जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे.कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे मागील महिनाभरापासून कृषी क्षेत्रातील बाजारपेठही ठप्प पडली होती. शेतमाल उपलब्ध असतानाही तो विक्री करता आला नाही.शिवाय शेतीच्या कामांनाही फटका बसला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ एप्रिल रोजी एक आदेश जारी केला असून त्यात परभणी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्र, कृषी विषयी साहित्य, साधनसामुग्रीची दुकाने, बीज प्रक्रिया केंद्र, बीज तपासणी प्रयोगशाळा, कृषी विषयक उत्पादने, कृषी सेवा पुरविणाºया अस्थापना, कृषी साहित्य दुरुस्त करणाºया अस्थापना, बोअरवेल मशीन पूर्ववत सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या निर्देशांचे पालन करीत कृषी अस्थापना सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या काळात सामाजिक अंतरांच्या नियमांचे पालन करावे, आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यातून किंवा राज्यातून मजूर आणण्यास प्रतिबंध केला आहे. जिल्ह्यातील कृषी विषयक अस्थापना सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिल्याने या क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बुधवारपासून कृषी बाजारपेठेत चहलपहल वाढण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे आयुष योजनांच्या समावेशासह सर्व आरोग्य सेवा सुरु करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे. त्यामध्ये दवाखाने, सुश्रूशागृह, चिकित्सालय, टेलि मेडिसीन सुविधा, औषधालय, औषध निर्माण केंद्र, वैद्यकीय उपकरणांची दुकाने, वैद्यकीय प्रयोगशाळा आणि संग्रह केंद्र, कोविड १९ च्या संबंधाने संशोधन करणारे औषध निर्माण केंद्र आणि वैद्यकीय संशोधन प्रयोगशाळा, पशूवैद्यकीय दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, कोविड १९ चे प्रतिबंध संबंधाने कार्य करणाºया मान्यता प्राप्त खाजगी संस्था, होमकेअर सेवा पुरविणाºया संस्था, रोग निदान संस्था आदी सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील सेवाही सुरु करण्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले. त्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा, त्यामध्ये ५० टक्के कर्मचारी कार्यरत असावेत, ई- कॉमर्स कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येणारी वाहने, आवश्यक त्या परवानगीसह सुरु ठेवता येतील. ज्यामध्ये अन्न औषध, वैद्यकीय उपकरणे, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे या सारख्या सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवेचा पुरवठा यांचा समावेश आहे.मत्स्य व्यवसायही होणार सुरु४जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय सुरु करण्यासंदर्भानेही जिल्हाधिकाºयांनी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार या व्यवसायाशी संबंधित प्रक्रिया असणारे व्यवसाय, खाद्य प्रकल्प त्यांची कापणी, छाननी, प्रक्रिया करणारे केंद्र, शीतगृह आणि या सर्वाची विक्री करण्यास परवानगी दिली आहे. तसेच अंडी उबविणारे केंद्र, मत्स्य खाद्य वनस्पती, व्यावसायिक मत्स्यालय आणि या सर्व व्यावसायासाठी लागणारे मासे, कोळंबी, मत्स्यबीज, खाद्य आणि कामगारांच्या हालचालीस परवानगी देण्यात आली आहे.बाजार समिती, कृषी निविष्ठांची दुकाने सुरु होणार४जिल्हाधिकाºयांच्या या आदेशामुळे कृषी क्षेत्रातील कोणती कामे सुरु होणार आहेत, याबाबत उत्सुकता आहे. या आदेशातील नमूद बाबींनुसार सर्व कृषी आणि बागायती उपक्रम पूर्णपणे कार्यरत राहतील. त्यात शेतकरी व शेतमजुरांकडून केली जाणारी शेतीविषयक कामे, कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा शासनाने अधिसूचित केलेला बाजार, राज्य सरकारमार्फत संचलित आॅनलाईन मार्केट, एफपीओ सहकारी संस्थेद्वारे तसेच शेतकरी व शेतकºयांच्या समूहाकडून खरेदी करणारे केंद्र, गाव पातळीवर खरेदीला प्रोत्साहन देणारे केंद्र, कृषी करिता लागणारी यंत्रांची दुकाने, त्यासाठी आवश्यक असणारे सुटे भाग, पुरवठा करणारी आणि दुरुस्त करणारी दुकाने सुरु राहतील. शेती यंत्राशी संबंधित किरायाने घ्यावयाच्या साधनांचा पुरवठा करणारे केंद्र, कीटकनाशक, बियाणे, खतांची निर्मिती करणारे, वितरण तसेच किरकोळ विक्री करणारे केंद्र, एकत्रित कापणी करता लागणारे यंत्र आणि इतर शेती बागायती औजारे, पेरणी संबंधीतील यंत्र सुरु ठेवण्याची मुभा या आदेशाद्वारे दिली आहे.रमजान महिन्यात घरातच धार्मिक कार्य पार पाडावे- मुगळीकर४मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत असून या महिन्यात सार्वजनिक नमाज अदा करण्याची प्रथा आहे. सद्यस्थिती विचारात घेता अधिक संख्येने नागरिक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने मुस्लिम समाज बांधवांनी लॉकडाऊनच्या काळात एकत्र न येता आपापल्या घरातच धार्मिक कार्य पार पाडावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.४जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना या विषाणूमुळे पसरत असलेला आजार संसर्गजन्य म्हणून घोषित केला आहे. नुकताच परभणी शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून पवित्र रमजान महिन्यात मुुस्लिम समाजातील नागरिक नमाजसाठी एकत्र येत असतात. त्यामुळे सद्यस्थिती लक्षात घेता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांनी आपापल्या घरातच नमाज अदा करावी, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी