परभणी: शासकीय धान्य गोदामात हलविला पुरवठा विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:06 IST2019-05-04T23:05:53+5:302019-05-04T23:06:59+5:30
तहसील कार्यालयांत कार्यान्वित असलेला पुरवठा विभाग त्या त्या ठिकाणच्या शासकीय धान्य गोदामात कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिले आहेत़

परभणी: शासकीय धान्य गोदामात हलविला पुरवठा विभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तहसील कार्यालयांत कार्यान्वित असलेला पुरवठा विभाग त्या त्या ठिकाणच्या शासकीय धान्य गोदामात कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिले आहेत़
शासकीय गोदामातून होणाऱ्या धान्याची उचल-वाटपाचे काम व सामान्य नागरिकांची पुरवठाविषयक सर्व कामे एकाच ठिकाणी करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी हा निर्णय घेतला असून, नायब तहसीलदार पुरवठा यांच्या समक्ष व नियंत्रणात शासकीय धान्य गोदामात कामकाज चालणार आहे़
१ मेपासून तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग शसकीय धान्य गोदामात कार्यान्वित करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे़ त्याचप्रमाणे सर्व तहसीलदारांनी पुरवठा विभागातील अव्वल कारकून, लिपिक, शिपाई यांना मुख्यालयी असलेल्या शासकीय धान्य गोदामात कार्यान्वित होईल, या दृष्टीने कारवाई करण्याचे सूचित करावे, नायब तहसीलदार पुरवठा यांनी पुरवठा विभागात होणाºया सर्व कामांवर व धान्याच्या उचल-वाटपावर नियंत्रण ठेवावे, पुरवठा विभाग विषयक सर्व कामे यापुढे धान्य गोदामात कार्यान्वित केलेल्या पुरवठा विभागात होतील, याची माहिती तालुक्यातील जनतेपर्यंत पोहचवावी, तसेच पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार, अव्वल कारकून व लिपिक यांच्याकडे इतर विभागाच्या कामाचा अतिरिक्त भार सोपवू नये, असे आदेशही जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिले आहेत़